१३५) ऑनलाइन प्रचार

खडे.. ओरखडे !

१३५) #ऑनलाइन प्रचार

ऑनलाइन बैठका घेतल्या,
शिक्षणही ऑनलाइन झाले ?
ऑनलाइन प्रचाराने आता,
उमेदवारांचे घोडे गंगेत न्हाले !!

निवडणुकीचे सर्व सोपस्कार,
ऑनलाइन पार पडायला हवे !
मतदारांना 'लक्ष्मीदर्शन'ही,
ऑनलाइनच घडायला हवे !!

          ◆◆◆◆◆