Posts

१७५) ध्यान आणि धारणा

*खडे.. ओरखडे !* *१७५) ध्यान आणि धारणा* *त्यांच्या सभेचा उत्सव होतो,* *त्यांच्या रोड शोचा उत्सव होतो !* *त्यांच्या ध्यान-धारणेचा,* *तर देशभर महोत्सव होतो !!* *त्यांची सभा, त्यांचा रोड शो,* *म्हणजे भक्तांना प्रेरणा आहे !* *पण त्यांचे 'ध्यान' राजकीय आहे,* *अशी विरोधकांची 'धारणा' आहे !!*             ◆◆◆◆◆             *राजेंद्र गिते, बार्शी.*

१७४) जनतेचा न्याय

*खडे.. ओरखडे !* *१७४) जनतेचा न्याय?* *असली आहेत त्यांना,* *नकली म्हणून हिणवले गेले !* *नकली आहेत त्यांना,* *असली म्हणून मिरवले गेले !!* *असली कोण? नकली कोण?* *कुणाच्या दाव्यात जोर आहे?* * जनतेच्या दरबारात ठरेल,* *कोण साव कोण चोर आहे !!*             ◆◆◆◆◆             *राजेंद्र गिते, बार्शी.*

१७३) घराणेशाही

*खडे.. ओरखडे !* *१७३) घराणेशाही* *कुठे दीर v/s भावजय,* *कुठे ननंद v/s भावजय आहे !* *नात्यागोत्याचे राजकारण आणि,* *घराणेशाहीतच जय-पराजय आहे !!* *कधी यांना, कधी त्यांना,* *सत्तेच्या पायघड्या असतात !* *कार्यकर्त्यांच्या बगलेत कायम,* *सतरंज्यांच्याच घड्या असतात !!*             ◆◆◆◆◆             *राजेंद्र गिते, बार्शी.*

१७२) भाडोत्री गर्दी

*खडे.. ओरखडे !* *१७२) भाडोत्री गर्दी* *सभेला गर्दी झाली,* *तरच सभा गाजत असते !* *नेत्यांचेही नाणे मग,* *खणखणीत वाजत असते !!* *गर्दी जमविण्यासाठी,* *भाड्याने लोक आणले जातात !* *भाडे मिळाले नाही तर,* *'भाडे' अर्ध्यातून निघून जातात !!*             ◆◆◆◆◆             *राजेंद्र गिते, बार्शी.*

१७१) आचारसंहितेची ऐशीतैशी

*खडे.. ओरखडे !* *१७१) आचारसंहितेची ऐसीतैसी* *कुणी हार घालत आहेत,* *कुणी नारळ फोडत आहेत !* *कुणी कुणी तर मनोभावे,* *EVM ला हात जोडत आहेत !!* *लोकशाहीवर विश्वास नाही,* *जनमताचा आदर नाही !* *असेही काही उमेदवार आहेत,* *ज्यांना आचारसंहितेची कदर नाही !!*            ◆◆◆◆◆            *राजेंद्र गिते, बार्शी.*

१७०) कीर्ती कर

*खडे.. ओरखडे !* *१७०) कीर्ती कर !* *अमोल 'कीर्ति कर'ण्यासाठी,* *कुणाला किती झटावे लागले !* *मुलाच्या टर्निंग पॉईंट साठी,* *बापाला विरोधात हटावे लागले !!* *विरोधात बाण सोडले तरी,* *नात्यांचे धागे जुळलेले होते!* *कितीही नाही म्हटले तरी,* *पोटाकडेच पाय वळलेले होते !!*             ◆◆◆◆◆             *राजेंद्र गिते, बार्शी .*

१६९) कायद्याचे राज्य

*खडे.. ओरखडे !* *१६९) काय'द्याचे' राज्य?* *पैसा, पद, प्रतिष्ठा पाहून,* *नेहमीच कायदा मोडला जातो !* *सामान्य माणसांसाठी मात्र,* *कायद्याचा किस पाडला जातो !!* *हव्या तशा न्यायासाठी,* *सगळी यंत्रणा सज्ज आहे !* *आपण मात्र घोकत बसायचे,* *आपले कायद्याचे राज्य आहे !!*             ◆◆◆◆◆             *राजेंद्र गिते, बार्शी.*