१६९) कायद्याचे राज्य
*खडे.. ओरखडे !*
*१६९) काय'द्याचे' राज्य?*
*पैसा, पद, प्रतिष्ठा पाहून,*
*नेहमीच कायदा मोडला जातो !*
*सामान्य माणसांसाठी मात्र,*
*कायद्याचा किस पाडला जातो !!*
*हव्या तशा न्यायासाठी,*
*सगळी यंत्रणा सज्ज आहे !*
*आपण मात्र घोकत बसायचे,*
*आपले कायद्याचे राज्य आहे !!*
◆◆◆◆◆
*राजेंद्र गिते, बार्शी.*