१७२) भाडोत्री गर्दी

*खडे.. ओरखडे !*


*१७२) भाडोत्री गर्दी*


*सभेला गर्दी झाली,*

*तरच सभा गाजत असते !*

*नेत्यांचेही नाणे मग,*

*खणखणीत वाजत असते !!*


*गर्दी जमविण्यासाठी,*

*भाड्याने लोक आणले जातात !*

*भाडे मिळाले नाही तर,*

*'भाडे' अर्ध्यातून निघून जातात !!*


            ◆◆◆◆◆

            *राजेंद्र गिते, बार्शी.*




Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य