१७३) घराणेशाही
*खडे.. ओरखडे !*
*१७३) घराणेशाही*
*कुठे दीर v/s भावजय,*
*कुठे ननंद v/s भावजय आहे !*
*नात्यागोत्याचे राजकारण आणि,*
*घराणेशाहीतच जय-पराजय आहे !!*
*कधी यांना, कधी त्यांना,*
*सत्तेच्या पायघड्या असतात !*
*कार्यकर्त्यांच्या बगलेत कायम,*
*सतरंज्यांच्याच घड्या असतात !!*
◆◆◆◆◆
*राजेंद्र गिते, बार्शी.*