दादा..! भाग- २१
*दादा..!*
*भाग -२१*
आमची दुपारची जेवणं आंब्याखालीच होत. गोल पंगत बसे. जेवणं झाली की, सगळे सावलीत आराम करत. आजूबाजूच्या शेतात काम करणारेही येत. गार गार सावलीत ऊन टाळत आणि पुन्हा कामाला लागत.
*शेतीचे बांध, जनावरांची वर्दळ आणि आंब्यावरुन आमच्या आणि भाऊंच्या 'घरात' नेहमीच कुरबुरी होत.* दादा आणि भाऊ बसून मिटवत. तिन्ही भावांत विचार होता, पण कधी कधी घरातून जोर वाढायचा. मग भांडणं विकोपाला जात. एकमेकांकडं जाणं, येणं, बोलणं, बसणंही बंद व्हायचं. *'प्रत्यक्ष संवाद संपला की कुत्र्या मांजरांच्या नावानं घालून, पाडून बोलणं सुरु व्हायचं. आंब्यांच्या दिवसांत भांडणं झाली की आंब्याकडं कोणी फिरकत नसे.* सगळ्या झाडाखाली आंब्यांचा खच पडायचा, तरी घरातलं कुणी हात लावत नसायचं. सावलीत बसून आम्ही फक्त टकमक बघायचो. गावातली शहाणी सुरती माणसं समजून सांगत. कधी मिटायचं, कधी नाही ! ती तरी कितीदा सांगणार? दोन तीन वर्षांतून असा प्रसंग यायचाच.
अशीच एकदा कडाक्याची भांडणं झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. *'दम' काढून काढून दादाही दमले असावेत. पुन्हा 'शहाण्या' माणसांनी मध्यस्थी केली. तिघा भावांची बैठक घेतली आणि जे व्हायला नको होतं तेच झालं. भांडणाचं खापर आंब्यावर फुटलं आणि सगळी झाडंच तोडायची ठरली.*
केजच्या व्यापाऱ्याला बोलावून घेतलं. सौदा केला आणि उभ्या झाडांची कत्तल सुरु झाली...
*लपाछपी खेळताना ज्या झाडांच्या मागं आम्ही दडलो.. सुरपारंब्या खेळताना ज्या झाडांच्या अंगाखांद्यावर आम्ही चढलो.. त्यांचेच आम्ही तुकडे तुकडे केले ! ज्या झाडांच्या सावलीत आम्ही हसलो, रडलो.. धावताना पडलो... पण वाढलो आणि घडलोही.. ती सावलीच आम्ही संपवली !! वाईटकाळात ज्या झाडांनी आम्हाला आधार दिला त्यांच्या बुंध्यावरच आम्ही घाव घातला ! ज्या झाडांच्या सावलीत पंगती झडल्या, ज्या आंब्याच्या झाडांनी आम्हाला फळं दिली, आनंद दिला, बरकत दिली, आमचे संसार उभे केले त्या झाडांचाच आम्ही खून केला.*
*झाडं आम्ही मोठी केली नव्हती, त्या झाडांनीच आम्हाला मोठं केलं होतं. 'आमची आमराई' हीच आमची खरी श्रीमंती होती.* पण पंधरा दिवसांत होत्याचं नव्हतं झालं. या दुर्दैवी घटनेला आता खूप वर्षे झाली, पण आजही शेतात गेलं की काळीज पिळवटून जातं, पोटात आग पडते. दिसेल त्या झाडाला कवटाळून मोठ्यानं ओरडावं वाटतं...
*पण आता काय उपयोग???*
*सौभाग्यनं नटलेलं आमचं शेत आता रंडकं-बोडकं झालं. हिरवागार शालू नेसलेल्या शेतीच्या भाळावरचं ठसठशीत कुंकू गेलं. आमचंच काय? आमच्या शिवाराचं वैभव गेलं !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*