१६०) गाव कारभारी
*खडे.. ओरखडे !*
*१६०)गाव कारभारी !*
*कुणाचा झाला धुरळा,*
*कुणी हुरळून गेला आहे !*
*गाव कारभारी होण्यासाठी,*
*कुणी होरपळून गेला आहे !!*
*ज्यांचे "रेट" जास्त होते,*
*त्यांचे सिलेक्शन झाले आहे !*
*आपापले रिलेशन जपा,*
*आता इलेक्शन झाले आहे !!*
◆◆◆◆◆
*श्री राजेंद्र गिते, बार्शी*