*लाख मोलाचं यश !*

*"लाख" मोलाचं यश !*


*वक्त से लडकर,*

*जो नशीब बदल दे,*

  *इंसान वही जो,*

   *अपनी तकदीर बदल दे |*

*कल क्या होगा कभी मत सोचो,*

*क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे ||*


   *मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' अभियानात बार्शी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था गटात रस्तापूर शाळेचा तिसरा क्रमांक आला.* यथावकाश श्री सिद्धरामेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापूर नगरीत विशेष समारंभात सन्मानपूर्वक, *'प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख'* रुपयांचा धनादेश मिळेल.


खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था गटात बार्शी तालुक्यातील सुमारे २०० च्या वर जिल्हा परिषदेच्या शाळा व बार्शी शहरातील २० पेक्षा जास्त नगर पालिकांच्या शाळांचा सामावेश होता.

स्पर्धा निश्चितच कठीण होती, परंतु पानगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय सिंधुताई गिलबिले मॅडम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मनोज पालकर व इतर सदस्यांनी आर्थिक सहकार्य केले. रस्तापूर ग्रामपंचायतीने हातभार लावला. विद्यार्थ्यांचे पालक तसेच ग्रामस्थांनी यथाशक्ती योगदान दिले. शाळा स्वच्छ, सुंदर करण्यासाठी आणि भौतिक सोयी सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी सगळं गाव एक झालं.. एकदिलानं झटलं.. आणि एकदिलानं लढलं ! आम्ही शिक्षकांनीही शाळेला अधिकचा वेळ दिला, तहानभूकेची व खर्चाची चिंता न करता प्रामाणिक प्रयत्न केले...


*गुणांकनानुसार शाळेचा तालुक्यात चौथा क्रमांक आला. साहजिकच सर्वजण निराश झाले...*


पहिल्या 'तीन' मध्ये रस्तापूरची शाळा नाही हे मानायला आमचं कुणाचंही मन तयार होत नव्हतं, सर्वजण अस्वस्थ होते. शिक्षण विस्तार अधिकारी मा चौधरी साहेबांनी दोन वेळा फोन करून आस्थेने विचारपूस केली. गटशिक्षणाधिकारी मा गुरव साहेबांची भेट झाली, तेव्हा त्यांनीही माहिती घेतली. दरम्यानच्या काळात तालुक्याचे गटविकास अधिकारी मा माणिकराव बिचकुले साहेबांनी शाळेला भेट दिली. आम्ही केलेल्या कामाचं, राबविलेल्या उपक्रमांचं तोंडभरून कौतुक केलं. शाळेचं व्हिडीओ शूटिंग करायला लावलं. *"रस्तापूरची शाळा तालुक्याच्या स्पर्धेत होती आणि सध्याही चर्चेत आहे", असं साहेबांनी सांगितलं. साहेबांचं हे वाक्य आमच्यासाठी बक्षिसापेक्षा काहीही कमी नव्हतं !*


पण म्हणतात ना..


*"जो किस्मत में होगा वो खुद चलकर आयेगा,*

*जो नहीं होगा वो पास आकर भी दूर चला जायेगा |"*


*बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांकावर आलेली शाळा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकासाठी निवडली गेली त्यामुळे रस्तापूरची शाळा आपोआप तिसऱ्या क्रमांकावर आली.*


  सर्वांनाच आनंद झाला. ज्यांनी आमचे कष्ट, आमचा संघर्ष जवळून पाहिला होता त्यांना तर आमच्यापेक्षा जास्त आनंद झाला...


शाळेतील उपशिक्षिका श्रीम सुवर्णा चव्हाण मॅडम यांची उत्तम साथ, शाळा व्यवस्थापन समितीचं भक्कम पाठबळ, केंद्रप्रमुख आणि अधिकाऱ्याचं प्रेरणादायी मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा कामी आल्या..


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,

*रस्तापूर सारख्या छोट्याशा गावातील छोट्याशा शाळेनं स्पर्धेत उतरण्याची धमक दाखवली !*

*मर्यादित मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसामग्री असताना स्पर्धेत टिकून राहण्याची जिगर दाखवली !!*

*...आणि लाख मोलाचं रुपेरी, चकचकीत, अदभूत, अविस्मरणीय आणि प्रेरणादायी यश संपादन केलं !!!*


*रस्तापूर गावाचा आणि शाळेचा मला सार्थ अभिमान आहे !*


*ना थके कभी पैर,*

  *ना कभी हिम्मत हारी है |*

   *हौसला है जिंदगी में,*

  *कुछ कर दिखाने का,*

   *इसलीये अभी भी सफर जारी है ||*


*श्री. राजेंद्र गिते,*

*मुख्याध्यापक, रस्तापूर, ता बार्शी*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य