*जिद्दी...*

*विश्वास...!*


*मंजिल उन्हे नहीं मिलती,*

  *जिनके ख्वाब बडे होते है |*

*मंजिल उन्हे मिलती है,*

   *जो जिद पर अडे होते है ||*


महाराष्ट्र ते जॉर्जिया.. व्हाया युक्रेन हा खडतर प्रवास करून विश्वासने MBBS पूर्ण केले...

*अत्यंत आनंददायी घटना आहे. बोंगे परिवाराचे खूप खूप अभिनंदन !*💐💐


*आज 'कोरोना' व 'युक्रेन × रशिया' युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण "त्या" दोन्ही काळात ग्रुपमधील सर्वजण बोंगे कुटुंबाच्या सतत संपर्कात होते....*


मार्च २०२० मध्ये कोरोनाची महामारी आली. सगळं जग लॉकडाउन झालं. कोरोनानं सगळ्यांना घरात लोटलं, कुणाला कुठेही जाता - येता येईना. *बोंगे कुटुंबाच्या जीवाची तर घालमेल झाली, कारण त्यांचा श्वास महाराष्ट्रात पण विश्वास युक्रेन मध्ये होता !*

...परिस्थिती भयंकर होती पण विश्वास शांत होता, मार्ग शोधीत होता, त्याला माहित होतं,

*"ऐसी कोई मंजिल नहीं, जहाँ पहुंचने का कोई रास्ता न हो !"*


*...आणि त्यानं मार्ग शोधलाही...*


काही काळानंतर सगळं सुरळीत सुरू झालं, आता शिक्षण पूर्ण होणार असं वाटत असतानाच युक्रेन-रशिया युद्ध सुरू झालं. प्रसंग बाका होता पण विश्वास खंबीर होता. कुटुंबाच्या संपर्कात होता. भारतात येण्याचा प्रयत्न करीत होता. तो काळ खरंच खूप कठीण होता. *त्या काळात बोंगे कुटुंबातील प्रत्येक जण कितीदातरी एकांतात रडले असतील, कितीदातरी एक दुसऱ्याच्या गळ्यात पडून रडले असतील पण ते विश्वासला धीर देत होते, सांगत होते, "प्रयास इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे !"*


*...आणि घडलंही तसंच !*

*भारत सरकारच्या महिन्याभराच्या प्रयत्नांना यश आलं आणि विश्वास भारतात आला...*


बराच काळ लोटला.

पण युक्रेन- रशिया युद्ध संपेना...

तेव्हा *'युक्रेन नहीं तो जॉर्जिया सही' म्हणत आणि अनेक अडथळे दूर करत विश्वास जॉर्जियातून MBBS झाला. त्याचं धैर्य, संयम आणि परिश्रम कौतुकास्पद आहेत...*


*बोंगे परिवाराचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !*


*विश्वास,*


अभी तो सफर शुरू किया है,

  *उडान अभी बाकी है |*

अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन,

*अभी नापना आसमान बाकी है ||*


*पुढील कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा !*💐💐💐






Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य