स्वच्छंदी..!
स्वच्छंदी..!!
राजू रायबान सर..
'मंगळवेढे' या संतांच्या भूमीत जन्मलेला, आपले छंद मनापासून जपणारा "स्वच्छंदी" माणूस. 'वासोटा गेट टुगेदर' च्या वेळी ओळख झाली, मैत्री झाली. त्यांच्या छंदांना शब्दबद्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न..
चाल _ या वाऱ्याच्या बसुनी विमानी
~~~~~~~~
स्वच्छंदी..!!
शिवसागरातील, बसुनी बोटीत,
सफर करुया, वासोट्याची,
चला रसिकहो, आज पाहूया,
आवड, राजू.. गुरुजींची
गेट टुगेदर, जमले सारे,
कोयनेच्या खोऱ्यात,
राजू गुरुजी, तिथे भेटले,
दिसले मोठ्या तोऱ्यात,
हसरा परिवार, सोबत होता,
ओढ, व्याघ्र.. गडाची
चला रसिकहो..
शाळेदिवशी, शिक्षण सेवा,
सुट्टी दिवशी भटकंती,
आळस नाही, या गुरुजींना,
गड, किल्ले खुणविती,
तंबूमध्ये, मुक्काम करतो,
सोबत चंद्र.. ताऱ्यांची
चला रसिकहो..
कधी बोटींग, कधी ट्रेकिंग,
फोटोग्राफी जंगलाची,
ड्रोनद्वारे व्हिडीओ शुटिंग,
करतो डोंगर, दऱ्यांची..
बसूनी एकांती, शीण घालवी,
तार छेडूनी.. गिटाराची
चला रसिकहो..
कधी रांगोळी, कधी पेंटींग,
नेहमी असतो आनंदी,
मन मर्जीचे जीवन सारे,
छंद जपतो, 'स्वच्छंदी,'
असे मिळाले, मित्र आम्हा,
नाती जपुया..मैत्रीची
चला रसिकहो..
◆◆◆◆◆
राजेंद्र गिते,बार्शी