वासोट्याच्या वाटेवर..!

वासोट्याच्या वाटेवर..!

वासोट्याची वाट बिकट,
चढाईचे आव्हान होते.
भटकंतीचे वेड मनांमध्ये,
सोबत 'शिंदे', 'चव्हाण' होते.

काय हवे ? काय नको ? 
स्वतः पाहात होते 'बोंगे'.
'लेंगरे' होते, 'कुंभार' होते,
सहकुटुंब होते 'रोंगे'.

'चेळेकरांचा' थाट वेगळा,
'देशमुख' आले सवडीने.
हो, नाही करता करता,
हेडगीरे' आले आवडीने.

'झाडे', 'पवार', 'गुरव', 'माळी', 
'बागल' ही आले ओढीने.
'गिते', 'गाढवे', 'बिरादार',
'गाजरे' ही आले जोडीने.

भेट पहिली, आपुलकीची,
मनामनांत 'ममता' होती.
पुन्हा नव्याने भेटू 'शकू',
काहींची कमतरता होती.

गोडी ही अपूर्णतेची,
वाढवीत राहील तृष्णा.
पुन्हा कमाल कॅमेऱ्याची,
दाखवील फुटूवाली 'कृष्णा'.

         ◆◆◆◆◆
           -- राजेंद्र गिते, बार्शी

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य