रंगांचा उघडुनिया पंखा,
सांज कुणी ही केली!
काळोखाच्या दारावरती,
नक्षत्रांच्या वेली!
सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे..!
या जन्मावर, या जगण्यावर,
शतदा प्रेम करावे..!
बालसंस्कार परिपाठच्या "पाणी विशेषांक" मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. दि २२ सप्टेंबर २०२३. *पाणी अडवा - पाणी जिरवा* ----------------------------------- *पानी रे पानी, तेरा रंग कैसा?* *भूखे की 'भूख और प्यास' जैसा !* "शोर" चित्रपटातलं हे गाणं पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारं आहे... खरं तर, *पाण्याला रंग नाही, पण पाण्यामुळेच जीवनात 'रंग' आहेत !* *पाण्याला वास नाही, पण पाण्यामुळेच पृथ्वीतलावर सजीवांचा रहि'वास' आहे !!* *पाण्याला गंध नाही, पण पाण्यामुळेच सृष्टीत सु'गंध' आहे !!!* अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातही वस्त्राशिवाय आपण जगू शकतो, निवाऱ्याशिवायही काही काळ जिवंत राहू शकतो पण अन्न, पाण्याशिवाय आपण एक आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही... *पाण्यामुळेच अस्तित्व आहे,* *पाण्यामुळेच स्पंदन आहे !* *पाणीच पृथ्वीवरील अमृत,* *पाण्यामुळेच जीवन आहे !!* शायर श्याम सुंदर अग्रवाल एका ठिकाणी लिहितात.. *सदा हमें समझाए नानी,* *नहीं व्यर्थ बहाओ पानी !* *हुआ समाप्त अगर धरा ...
*दादा..!* *भाग - ४२* बीडला गावातून गाडी नव्हती, शिरूरपर्यंत पाच किलोमीटर चालत नाहीतर बैलगाडीनं जावं लागायचं. तिथून सकाळी साडेसात आणि दुपारी अडीच वाजता गाडी असायची. रविवारी अडीचच्या गाडीनं आमचं बीडला जायचं ठरलं. दादा आम्हाला सोडवायला येणार होते. सकाळी लवकर उठून आवरायचं होतं, म्हणून मी शनिवारी थोडं लवकरच झोपलो. कशीबशी एक झोप झाली, अचानक जाग आली. पुन्हा काही झोप लागेना. *नांदूर पेक्षा मोठं गाव कधी बघितलं नव्हतं. आता 'बीडला शिकायला जायचंय', याचा आनंद पोटात मावत नव्हता, पण डोक्यातले विचारही थांबत नव्हते...* *कसं असेल बीड?* *मनात कुतूहल होतं, बीड बघण्याची उत्सुकता होती. पण कधी कधी वाटायचं, साध्या पिंपरीच्या यात्रेत आपल्याला खालतं-वरतं कळत नाही.. एवढ्या मोठ्या बिडात आपण चुकायचो तर नाही. आपला अवतार बघून शहरातली पोरं खेड्यातलं येडं म्हणून चिडवायची तर नाहीत?* जाताना गणवेश घालावा की साधे कपडे? हा प्रश्नही काही केल्या सुटत नव्हता. नाहोलीला आठवीत असताना पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असा गणवेश होता. बुधवारी गणवेशाला सुट्टी असायची, त्या दिवशी वर्गातली काही मुलं फुल पॅन्ट, शर्ट घालून...