४३) वाढदिवस
खडे.. ओरखडे !
४३) #वाढदिवस
Whatsapp आल्यापासून,
लोक जन्मदिवस आठवू लागले !
मनात असो किंवा नसो,
शुभेच्छा मात्र पाठवू लागले !!
नेत्यांच्या वाढदिवसात तर,
कार्यकर्त्यांचाच थाट असतो !
मायबापाचा नसला तरी,
नेत्यांचा वाढदिवस पाठ असतो !!
◆◆◆◆◆