२८) लसीकरण !

खडे.. ओरखडे !

#लसीकरण

शंका, कुशंका, गैरसमज,
सगळे आता दूर झाले !
लस टोचून घेण्यासाठी,
मन आता आतुर झाले !!

पहाटे पासूनच लोक,
एक दुसऱ्याला उठवू लागले !
लसीकरण केंद्रापुढेच,
'सोशल डिस्टन्स मिटवू लागले' !!

          ◆◆◆◆◆
          


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य