रंगांचा उघडुनिया पंखा,
सांज कुणी ही केली!
काळोखाच्या दारावरती,
नक्षत्रांच्या वेली!
सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे..!
या जन्मावर, या जगण्यावर,
शतदा प्रेम करावे..!
*खडे.. ओरखडे !* *१७२) भाडोत्री गर्दी* *सभेला गर्दी झाली,* *तरच सभा गाजत असते !* *नेत्यांचेही नाणे मग,* *खणखणीत वाजत असते !!* *गर्दी जमविण्यासाठी,* *भाड्याने लोक आणले जातात !* *भाडे मिळाले नाही तर,* *'भाडे' अर्ध्यातून निघून जातात !!* ◆◆◆◆◆ *राजेंद्र गिते, बार्शी.*
*दादा..!* *भाग - ४२* बीडला गावातून गाडी नव्हती, शिरूरपर्यंत पाच किलोमीटर चालत नाहीतर बैलगाडीनं जावं लागायचं. तिथून सकाळी साडेसात आणि दुपारी अडीच वाजता गाडी असायची. रविवारी अडीचच्या गाडीनं आमचं बीडला जायचं ठरलं. दादा आम्हाला सोडवायला येणार होते. सकाळी लवकर उठून आवरायचं होतं, म्हणून मी शनिवारी थोडं लवकरच झोपलो. कशीबशी एक झोप झाली, अचानक जाग आली. पुन्हा काही झोप लागेना. *नांदूर पेक्षा मोठं गाव कधी बघितलं नव्हतं. आता 'बीडला शिकायला जायचंय', याचा आनंद पोटात मावत नव्हता, पण डोक्यातले विचारही थांबत नव्हते...* *कसं असेल बीड?* *मनात कुतूहल होतं, बीड बघण्याची उत्सुकता होती. पण कधी कधी वाटायचं, साध्या पिंपरीच्या यात्रेत आपल्याला खालतं-वरतं कळत नाही.. एवढ्या मोठ्या बिडात आपण चुकायचो तर नाही. आपला अवतार बघून शहरातली पोरं खेड्यातलं येडं म्हणून चिडवायची तर नाहीत?* जाताना गणवेश घालावा की साधे कपडे? हा प्रश्नही काही केल्या सुटत नव्हता. नाहोलीला आठवीत असताना पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असा गणवेश होता. बुधवारी गणवेशाला सुट्टी असायची, त्या दिवशी वर्गातली काही मुलं फुल पॅन्ट, शर्ट घालून...