फरक..!

फरक..!

लोळे सुख दारी कुणाच्या,
 कुणी लोळे सुखाच्या दारी !
  शिगलोड भरली घरे कुणाची,
   कुणी फिरतोय दारोदारी !!

ताज कुणाच्या मस्तकावरी,
 कुणाच्या टाळूवर जोडे !
  थांबणारे हात कुणाचे,
   कुणी म्हणे द्या अजून थोडे !!

लोळतात कुणी गादीवर,
 पायतळी कुणी लुडबुडे !
  लंबोदरावरी हात कुणाचा,
   पसरलेत कुणी हात पुढे !!

बिनकामाचा घाम कुणाला,
 शोधीत फिरतो कुणी काम !
  घाली वारा यंत्र कुणाला,
   सोग्याने पुसतो कुणी घाम !!

स्वार्थ दडला उरी कुणाच्या,
 विश्वाचा असे कुणाला ध्यास !
  कमवी कुणी पिढ्यानपिढ्याचे,
   फक्त पोटाचा कुणा हव्यास !!

        ◆◆◆◆◆
        

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य