५२) कोरोना इफेक्ट
खडे.. ओरखडे !
५२) #कोरोना इफेक्ट
दहावी आणि बारावीची,
काही मुले लकी आहेत !
मन लावून अभ्यास केला,
तेच मनात दुःखी आहेत !!
एकमेकांची ओळख नाही,
नाव मात्र दप्तरात आले !
शाळेचे तोंडही न पाहता,
पहिलीचे दुसऱ्या वर्गात गेले !!
◆◆◆◆◆