५५) काळजी तुमची...
खडे.. ओरखडे !
५५) #'काळजी तुमची...'
कुणाचे 'पाऊल पुढे' आहे,
कुणाचा 'विचार नवीन' आहे !
'उघडा डोळे... बघा नीट',
कोणते 'चॅनेल तरूण' आहे !!
'तुमच्या काळजी'साठीच,
जाहिरातींना खपवले जाते !
'महाराष्ट्राच्या हिता'मध्येच,
चॅनेलचे हित लपवले जाते !!
◆◆◆◆◆