६१) स्वबळाचा नारा
खडे.. ओरखडे !
६१) #स्वबळाचा नारा
कुणाच्या गुप्त भेटी आहेत,
कुणाच्या मनात गाठी आहेत !
जुळवाजुळव करण्यासाठी,
कुणाच्या भेटीगाठी आहेत !!
अध्यक्षांच्या 'नाना' तऱ्हा,
आणि निराळाच तोरा आहे !
बळ अपुरेच आहे तरीही,
मुखी 'स्वबळाचा नारा' आहे !!
◆◆◆◆◆