६०) अवैध

खडे.. ओरखडे !

६०) #अवैध

जात मिळते जन्मानेच,
तिच्यावरून खिजवू नये !
त्यात आपले कर्तृत्व काय?
तीचे अवडंबरही माजवू नये !!

बनावट कागदपत्रे जुळवून,
कुणी जातच चोरू लागले !
अवैध मार्गाने सत्तास्थानावर,
सरळ डल्ला मारू लागले !!

          ◆◆◆◆◆
          



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य