७१) जित्याची खोड
खडे.. ओरखडे !
७१) #जित्याची खोड
'आम्ही तयार आहोत',
शासनाने दावा केला !
'यंत्रणाही सज्ज आहे',
प्रशासनाने दुजोरा दिला !!
संक्रमित होण्याची आता,
जनतेत चढाओढ आहे !
'मेल्याशिवाय जात नाही',
ही 'जित्याची खोड' आहे !!
◆◆◆◆◆