९४) पक्ष महिमा
खडे.. ओरखडे !
९४) #पक्ष महिमा
ईडीचा ताप नाही,
निद्रानाशाचे निर्मूलन झाले !
मनात 'हर्ष - वर्धन झाल्याचे,
पाटलांनी 'जाहीर निवेदन' दिले !!
ते ते आता राम झाले,
जे जे आधी रावण होते !
पक्षाचा महिमा अगाध आहे,
सर्व पापांचे क्षालन होते !!
९४) #पक्ष महिमा
ईडीचा ताप नाही,
निद्रानाशाचे निर्मूलन झाले !
मनात 'हर्ष - वर्धन झाल्याचे,
पाटलांनी 'जाहीर निवेदन' दिले !!
ते ते आता राम झाले,
जे जे आधी रावण होते !
पक्षाचा महिमा अगाध आहे,
सर्व पापांचे क्षालन होते !!
◆◆◆◆◆