१०५) गैरवापर

खडे.. ओरखडे !

१०५) #गैरवापर

साम, दाम, दंड, भेदाच्या,
सोबतच आता ईडी आहे !
सत्ता सोपान गाठण्याची,
ती कायदेशीर शिडी आहे !!

विरोधकांना पोचवायलाही,
या शिडीचा वापर मस्त होतो !
नेहमीच सत्तेचा 'वापर कमी',
आणि 'गैरवापरच जास्त' होतो !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२