१२९) पायरी !

खडे.. ओरखडे !

१२९) #पायरी

कोण करतो अंगविक्षेप,
कोण म्याव म्याव करतो आहे !
बेवारस प्राण्यांच्या आवाजाची,
कोण नक्कल करतो आहे !!

जसे ज्याचे संस्कार आहेत,
तशी लोकशाही वाकवू लागले !
विधानभवनाच्या पायऱ्यांवर,
आपापली 'पायरी' दाखवू लागले !!


          ◆◆◆◆◆
          







Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२