दादा..! भाग-१७
*दादा..!*
*भाग -१७*
*तमन्नाओं की महफिल तो हर कोई सजाता है,*
*पूरी उसकी होती है जो तकदीर लेकर आता है |*
आबा, कृष्णा आणि शांता दवाखान्यात आले, तेव्हा दुपार टळून गेली होती. आबा दादांच्या उशाजवळ बसले होते. त्यांनी दादांचा हात हातात घेतला होता. मी जवळच उभा होतो. *आबांनी दादा.. दादा म्हणून दोनदा हाका मारल्या. तिसऱ्या हाकेला आबांचा आवाज घोगरा झाल्यासारखा वाटला. काही क्षण शांततेत गेले.* वॉर्डमध्ये सफाई चालू होती. आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं...
आम्ही बाहेर येऊन बसलो.
आबा म्हणाले, "दादा पडल्याचं सगळ्या गावात माहीत झालंय, जवळपासच्या पाहुण्यांनाही कळलंय, सगळे मलाच विचारात होते. दादांना काय झालंय?"*
मी तरी काय सांगणार?
*मी माझ्याच विचारात होतो. मला पुन्हा 'ते' दिवस आठवले....*
माझी चौथीची परीक्षा संपली तेव्हा एप्रिल संपत आला होता. शाळेला नसल्या तरी, आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. शेतातली जागल मोडली तरी आम्ही फक्त रात्री झोपण्यापुरतं घरी जायचो, ऊन खूप पडायचं. *तेव्हा आमच्या घरावर पत्रे होते, उन्हानं घरावरचे पत्रे तापत, अंगाला घामाच्या धारा लागत. बाहेर पडलं की अंगाची लाहीलाही होई. 'घरात घाम.. बाहेर ताप' अशी परिस्थिती होती. मासा पाण्याबाहेर काढून तापलेल्या वाळूवर ठेवावा, तशी अवस्था व्हायची. जीव कासावीस व्हायचा. आम्हाला एकमेव आधार होता तो आमच्या अमराईचा ! दुसरीकडं कुठंच 'दम' निघत नव्हता.* आमचा अख्खा दिवस आमराईत जायचा. दोन आंब्याला पाड लागले होते, पण अजून ते आंबे उतरले नव्हते.
एके दिवशी एक किस्सा घडला...
भर दुपारची वेळ होती, दुपारची जेवणं झाली होती. दादा, आबा पोतं टाकून त्यावर लोळत होते. आम्ही आंब्याच्या सावलीत खेळत होतो. तहान लागली होती, पण पाणी संपलं होतं. शेतात विहीर नसल्यानं पाण्याची सोय नव्हती. गावातून हापस्याचं पाणी न्यावं लागे.
मी दादाला म्हणालो, "दादा, आपल्याला विहीर नाही, चांगलं घर नाही. कधी होणार हे सगळं?"
दादांनी बप्पा, कृष्णा आणि बालूला बोलवायला सांगितलं. मी त्यांना बोलावलं.
*दादा म्हणाले, "अक्कल काय खाते?"*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*