दोन शब्द..!

*दोन शब्द..*

*दि.०३.०५.२०२२*
*आज अक्षय तृतीया...*

अक्षय राहो धनसंपदा,
*अक्षय राहो शांती..!*
अक्षय राहो मनांनातील,
*प्रेमळ, निर्मळ नाती..!!*

*साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या "अक्षय तृतीया" निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!!!*

   एप्रिल २०२० च्या सुरुवातीला 'रसिक वाचक' चा जन्म झाला. दोन वर्षे झाली. या दोन वर्षांत नियमित वाचन, लेखन करुन आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून ग्रुप सतत हालता ठेवणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासून अभिनंदन..!

   पहिला लॉकडाऊन खूपच कडक होता, कोण विसरेल तो काळ! सगळे घरात होते, भरपूर वेळ होता, पण काही काम नव्हतं. आधार होता तो आपल्या 'रसिक वाचक' ग्रुपचा. त्या काळात वाचन, लेखन आणि सगळ्यांशी मनसोक्त संवाद घडला. अनेक नवे मित्र मिळाले, त्यांच्या आचार, विचारातून खूप काही शिकता आलं. त्यांच्या अनुभवातून सकारात्मक ऊर्जा मिळाली. वाचन करता करता थोडंफार लिहिता आलं, आणि *सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ग्रुपमुळं एक 'नवी ओळख' मिळाली...*

  परंतु मागील काही दिवसांत इतर कामामुळं वाचन, लेखनाला वेळ देता आला नाही, हे खरं आहे !

   दरम्यानच्या काळात आदरणीय बोंगे सर, रसिकराज गाजरे सर, चटे सर, शिवगुंडे मॅडम, कांबळे मॅडम अशा अनेकांशी बोलणं झालं. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने बोंगे सरांशी दोनदा भेटही झाली, आणि 'हात लिहिता राहिला पाहिजे' हा संदेश त्यांनी पुन्हा एकदा दिला...

  तसं पाहिलं तर मी काही कवी, लेखक नव्हतो आणि नाही, परंतु *मा.बोंगे सरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत असल्यामुळे मी पुन्हा एकदा अनुभव लेखनाचे धाडस करीत आहे...*

*लहानपणापासून 'जे पाहिलं, जे अनुभवलं' ते 'जमेल तसं' आणि 'जमेल तेवढं' सत्य मांडण्याचा प्रयत्न करीत आहे....*
*उद्यापासून...!*
*क्रमशः*

                          *श्री राजेंद्र गिते,बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य