१४७) राष्ट्रसंत

खडे.. ओरखडे !

१४७) #राष्ट्रसंत

बाबा आहेत, बापू आहेत,
साधू, संत, महंत आहेत !
ज्यांना जास्त गोतावळा,
ते तर 'राष्ट्रसंत' आहेत !!

भक्तांच्या अडचणीवर म्हणे,
साधू - संतांकडे मार्ग असतो !
भक्तांत 'लीन' झालेल्या,
राष्ट्रसंतांना मात्र स्वर्ग असतो !!

          ◆◆◆◆◆
         






Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य