दादा..! भाग- १२
*दादा..!*
*भाग - १२*
ज्वारीची कणसं खुडून घेतल्यानं शेतात सगळीकडं कडबा पसरलेला असे. तो आंबट-ओला असेपर्यंतच त्याच्या पेंढ्या बांधाव्या लागत. *पेंढ्या बांधण्यासाठी त्याच कडब्यातली काही चिपाडं वापरली जातात, त्याला 'आळा' म्हणतात. वाळलेल्या चिपाडांचा आळा घट्ट बसत नाही.. सुटतो, आणि पेंढी विस्कटते. कुटुंबाचंही तसंच नाही का? आळा सुटतो, तेव्हा कुटुंब फुटतं!*
*सुगीच्या दिवसांत शेतात मुक्कामाला राहिलं की राखणही होते आणि सकाळी लवकर उठून कामालाही लागता येतं.* दादा, आबा भल्या पहाटे उठून कडबा बांधत. कडबा बांधून झाला, की तो बैलगाडीनं एका ठिकाणी गोळा करत. यथावकाश त्याची गंजी रचत. कडब्याची आटोपशीर गंजी रचणं ही सुद्धा एक कला आहे. आबाला सुंदर गंजी रचता येत असे. बाहेरुन कडब्याच्या फक्त मुळ्या दिसत. पावसाचं पाणी मुळ्यांवरुन खाली ओघळून जाई, कडबा भिजत नसे. *कितीही त्रास झाला तरी शेतकरी विळ्यानं ज्वारी कापत नाही, उपटून काढतो, ती याचसाठी !*
गंजी रचतानाचा एक किस्सा आमच्या गावात आजही सांगितला जातो...
गंजी रचण्यासाठी गावात काहीजण नावाजले होते. अशीच एक जोडी होती. ते दोघे चांगले मित्रही होते. एकदा ते दुसऱ्याच्या शेतात गंजी रचत होते. एकजण खालून वर कडब्याची पेंढी फेकायचा, दुसरा ती पेंढी अलगद झेलून गंजी रचायचा. एका पेंढीत साप होता, पेंढी वर फेकताना तो खाली पडला. खालच्या माणसाच्या पायाला चावला, आणि निघून गेला. त्याचं त्याकडं लक्षच नव्हतं. वरच्यानं ते पाहिलं, पण सांगितलं नाही. रक्त निघालं, तेव्हा तो खाली आला. धसकट लागलं असेल, असं सांगून त्यानं वेळ मारून नेली, आणि रुमालानं मित्राचा पाय पोटरीखाली घट्ट बांधला...
एक वर्ष गेलं...
दुसऱ्या वर्षी, तीच जोडी, त्याच शेतात गंजी रचत होती. वरच्याला आदल्या वर्षीची आठवण आली...
तो म्हणाला, "मित्रा, पेंढी वर फेकताना काळजी घे. गेल्या वर्षी तुझ्या पायाला धसकट लागलं नव्हतं, साप चावला होता, पण मी सांगितलं नाही."
हे ऐकताच खालून पेंढ्या फेकणारा मित्र घाबरला, अंगाला दरदरून घाम फुटला. ऑss करुन तो खाली कोसळला. दुसऱ्याने त्याला पाठीवर घेतलं. मंत्रोपचार करण्यासाठी गावात घेऊन निघाला, पण उपयोग झाला नाही...
*काहीही असो, मानसिक भीती माणसाला खाते, हे नक्की !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*