दादा..! भाग- १
*दादा..!*
*भाग - १*
सकाळी सकाळी माझी आवराआवर बघून दादाला राहवलं नाही.
"राजू, थोडं थांब, तासा दीड तासात सैपाक व्हईल, जेवणं करा.. मग जा."
"नको दादा, लवकर निघालं तर उनाच्या आधी जाईन करमाळ्यात." मी स्पष्टीकरण दिलं.
"बरं बघ तुझ्या मनानं," दादानं विषय लांबवला नाही.
तोपर्यंत आबानं डहाळं अन मक्याच्या कणसांनी भरलेली पिसवी गाडीला बांधली. तिचंही उरकलं होतंच. *दोघंही दादा, आबा, आई, काकू अन म्हाताऱ्या बाईच्या पाया पडलो. काकूनं गालाचा मुका घेतला, बाईनं गालावरुन हात फिरवला, कानाच्या वर बोटं दुमडून कडाकडा मोडली. "म्हातारं व्हा !" म्हणून आशीर्वाद दिला. आमचं बघून बघून पोरांच्याही अंगवळणी पडलं होतं. पोरंही सगळ्यांच्या पाया पडली.* एकाला पुढं आणि दुसऱ्याला दोघांच्या मध्ये बसवून आम्ही निरोप घेतला.
धाकटा भाऊ वकील, तो बीडला, एक चुलत भाऊ शिक्षक, तो नांदूरला राहायचा. ते जेवणं करुन जाणार होते. बाकीचे गावातच राहात. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे एकत्र राहायचो. काल बोकडाचा कार्यक्रम होता, म्हणून जमलो होतो.
नांदूर - चौसाळा - खर्डा - जामखेड मार्गे करमाळ्यात पोचायला बारा वाजून गेले. उन्हाचा पारा चढला होता. खिशातून मोबाईल काढला...
बघतो तर काय !
चार मिस्ड कॉल...
फोन लावला.. *भाऊ सांगत होता, "दादा शेतात जाताना चक्कर येवून पाठीमागं पडले.. एक अणकुचीदार दगड डोक्यात घुसला... बीडला घेतलं नाही.. औरंगाबादला चालवलं आहे"!*
*क्रमशः..*
*श्री.राजेंद्र गिते, बार्शी.*