दादा..! भाग- ५
*दादा..!*
*भाग - ५*
*सुखाचे क्षण कसे भुर्रकन सरतात, पण दुःखद प्रवास संपता संपत नाही !*
एकदाचं औरंगाबाद आलं, तेव्हा दोन वाजून गेले होते. रिक्षानं दवाखाना गाठला. बालू आणि पिनू एका बाकड्यावर बसलेले दिसले, त्यांनीही मला पाहिलं. मी त्यांच्याजवळ गेलो, बालूजवळ डब्याची पिशवी ठेवली. पिनू उठून चालायला लागला, मी त्याच्या मागं मागं...
दादा तिसऱ्या मजल्यावर आय सी यू मध्ये होते. पिनू दारातच थांबला, काकू स्टुलवर बसलेली दिसली. मी तडक तिथं गेलो. मला बघून ती उठायला लागली, मी हातानंच बसायची खूण केली. तिनं एक आवंढा गिळला. पदरानं तोंड झाकलं. *दादाचं डोकं पट्ट्या बांधून बांधून मोठं केलं होतं. ते जोराजोरात श्वास घेत होते.. सोडत होते. घशातून घर.. घर असा आवाज येत होता. छाती आणि पोट खाली-वर होत होतं.* इकडून तिकडून नळ्या लावल्या होत्या...
"सलाईन नाही का?" काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं.
"थोडा वेळ झालं.. संपलय."
"काही बोलले का?" काकू काहीच बोलली नाही...
"बघतेत का?" तिनं नकारार्थी मान हलवली.
मी दादा.. दादा म्हणून हाका मारल्या. काहीच प्रतिसाद आला नाही. थोडावेळ थांबलो, मला अवघडल्यासारखं झालं. खाली आलो. बालूशेजारी येऊन बसलो. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही.
"डॉक्टर काय म्हणाले?" न राहवून मी विचारलं.
*लहान मेंदूला मोठी दुखापत झालीय, रक्त खूप गेलंय."* बालू
"जेवणं केली का?" मी विषय बदलला.
"नाष्टा केला होता..." पिनू म्हणाला.
"जेवणं करून घ्या, डबा आणलाय." मी.
"आशाताई अन भाऊजी जवळ आलेत. जेवू सगळे मिळूनच." पिनू.
थोडावेळ असाच गेला...
गावाकडून अशोक मेटे यांचा फोन आला. फोनवर निर्मला भाभी होत्या. आमच्या शेतात जायचा रस्ता त्यांच्या घरासमोरुनच जातो...
त्यांचा पहिलाच प्रश्न,"अण्णा, दादा कसैत?
मी 'बरे आहेत' म्हणून सांगितलं.
*"बरं झालं, काल आम्ही दारात जेवत होतो.. शेतात जाताना दादा एकटंच बोलत होतं.. हसत होतं.. थोडं पुढं गेलं अन आमच्या देखत पडलं.. आम्हाला तर वाटतंय.. त्यांना हर्षवायूचाच झटका आला."*
*"काय???" मी दचकलोच.*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*