दादा..! भाग-१६
*दादा..!*
*भाग - १६*
*तमाशा म्हणजे महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार !* ग्रामीण भागात तमाशाचा खास प्रेक्षकवर्ग होता. गणगौळण, बतावणी, रंगबाजी आणि वगनाट्य अशा क्रमाने तमाशाचे फड रंगत.
तमाशाच्या खेळात विघ्न येऊ नये, म्हणून गणपतीची आराधना करतात.. तो गण !
मथुरेला दूध, दही, लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणींना श्रीकृष्ण अडवितो. तेंव्हा मावशी आणि पेंद्या यांचे हास्यरसातील संवाद, गवळणींची शृंगाररसातील गाणी म्हणजे.. गौळणी !
आणि तमाशातील शृंगारिक लावण्या म्हणजेच रंगबाजी !
*गणगौळण आणि रंगबाजीनं प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायचं, पण तमाशाचं सगळ्यात महत्त्वाचं अंग म्हणजे वगनाट्य !* पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा नाट्यरुपात सादर करणं म्हणजे वगनाट्य.
उत्तरेश्वर पिंपरीच्या यात्रेत सौ.मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचे तमाशा मंडळ दरवर्षी यायचे. काळू बाळू तमाशा मंडळ कोल्हापूरकर, शाहीर दत्तोबा तांबे शिरोलीकर हे कधी कधी येत.
आम्ही दिवसभर यात्रेचा आनंद घ्यायचो. दिवस मावळतीला परत गावाकडं यायचो. आबा म्हशीच्या धारा काढत. दादा बैलांना पाणी, वैरण बघत. पटपट जेवणं उरकून आम्ही तमाशा बघायला निघत. आम्ही लहान होतो, तरीही दादा, आबा आम्हाला तमाशाला घेऊन जात. *दादा म्हणत, "सगळे पोटासाठीच करतात. चोऱ्या माऱ्या करून, लांडया लबाड्या करून पोट भरण्यापेक्षा लोकांना हसवून पोट भरलेलं चांगलंच की !"*
आमच्या गावात रघुवीर खेडकरचे खूप चाहते होते. आसपास कुठेही त्यांचा तमाशा असल्याचं समजलं की चाहते हजर होत, "रघुवीर खेडकर सोबत माझी ओळख आहे, त्याने मला गुड दिला, माझ्या खांद्यावर हात टाकला." असं ते सांगत, तेव्हा आम्हाला त्यांचं खूप कौतुक वाटे.
*वगनाट्य सुरु व्हायला उशीर व्हायचा, तरीही आम्ही थांबत. गणगौळण, रंगबाजी आणि बतावणीनं हसणारी लोकं वगनाट्य बघून गंभीर होत, अंतर्मुख होत. 'इष्कानं दाखविला इंगा', 'तांबडं फुटलं रक्ताचं', 'सख्खे भाऊ पक्के वैरी' ही वगनाट्ये लोकांच्या डोळ्यांत पाणी आणत.*
*तमाशात सगळंच असतं, त्यातून आपण काय घेतो? ते महत्वाचं !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*