दादा..! भाग- २०
*दादा..!*
*भाग - २०*
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे जल्लोष असायचा. आम्ही मुलं फक्त झोपण्यापुरतंच घरी जायचो. उजाडलं की आंब्याखाली ! *पाड लागलेल्या आंब्याखाली पाडांची परपंड झालेली असायची. ते पाड गोळा करायचे, त्याचे तीन हिस्से करायचे, भाऊला एक द्यायचा आणि आम्हाला दोन घ्यायचे. हे सकाळचं पहिलं काम असायचं!*
चांगला पाड लागला की आंबे उतरत. खूप आंबे वाटून येत. खाली-वर उसाचं पाचट घालून एका खोलीत आंबे पिकायला घातले जात. खोलीत पाय ठेवायला जागा राहात नसे. घरभर अढी लागायची. *आठवड्याभरात आंबे रसाला येत. सगळीकडं घमघमाट सुटायचा ! मग काय? कुठंही हात घाला, सोन्यासारखे पिवळेधमक, रसाळ आंबे हाताला लागत !*
घरात जागा झाल्याशिवाय दुसरा आंबा उतरता येत नसे. मग खूप पाड पडत. रात्रीत पोतं-पोतं पाड ! दिवसभर तर आम्ही टपूनच असत, टप् वाजेल तिकडं धावत सुटत! पाड खाण्याची चंगळ असायची. खाताना रस हातावरुन ओघळून कपड्यांवर पडायचा. तोंड शर्टाच्या बाहीला अन हात चड्डीला पुसायचे. *आमचा अवतार बघण्यासारखा व्हायचा. एकदम कडक ! पण आम्हाला त्याची फिकीर नसायची. संध्याकाळी पुन्हा रस ! नको नको व्हायचं, तरीही उरलेला रस म्हातारी बाई प्यायला द्यायची. नको म्हणलं की जवळ घेवून म्हणायची, "एवढयाच येळंस पी गं माय, उद्या नाही देत !"*
आम्ही फक्त रसाचे आंबे विकायचो, चांगला भाव मिळायचा. लोकं घरी येऊन घेऊन जात. पाडाचे आंबे लोभातल्या माणसांना वाटायचो, तसा अर्धा गाव लोभाचाच होता ! *आंब्याच्या मोसमात घरी, आंब्याकडं आलेला माणूस दादांनी कधी रिकाम्या हातानं जाऊ दिला नाही. दादा म्हणत, "वाटून खाल्यानं कमी होत नसतं, वाटुळं होण्यापेक्षा वाटलेलं चांगलंच की !* पाड लागलेल्या आंब्याकडं भुरट्या चोरांचं लक्ष असायचं. उतरायला उशीर झाला की डल्ला मारत.
एका वर्षी मोठी खैर झाली. साखऱ्याला चांगला पाड लागला होता. गावातल्या आंबे उतरणाराला बोलावलं होतं. तो खुडीनं खालून आंबे उतरत होता. दादा, आबा त्याला मदत करायला एका फांदीवर गेले होते. गरज नसताना मी मागून त्याच फांदीवर गेलो. *आंब्याचं ओझं आणि आमच्या तिघांचं ओझं, फांदीला झेपलं नाही. काही कळायच्या आत फांदी मोडली, खालच्या फांदीवर आदळली. आम्ही तिघे खाली पडलो आणि वरुन ती फांदी अंगावर पडली. खरचटलं, मुका मार लागला, पण मोडतोड झाली नाही.*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*