दादा..! भाग- २८
*दादा..!*
*भाग - २८*
*दादा, आबांना दोन बहिणी होत्या. भामाबाई आणि जनाबाई.* जनाआत्या केजजवळ सातेफळ मध्ये कांदेंना दिली होती. दादा, आबांचा तिच्यावर खूप जीव होता. त्यांच्याकडं पोटापुरती जमीन होती, जोडधंदा म्हणून तिच्या घरीही खव्याची भट्टी होती. चांगली दोन मुलं झाली, एक मुलगी झाली. सगळं चांगलं चाललं होतं. अचानक आत्याला 'पोटातला' आजार झाला, म्हणून निमित्त झालं. कळंबमध्ये उपचार घेतले, पण त्यातून ती सावरलीच नाही.
*हळूहळू कांदेंचे आणि आमचे संबंध तुटले तर नाहीत, पण घट्ट जुटलेही नाहीत.*
भामाआत्या जवळच नाहोलीत मोहन बिक्कड यांना दिलेली. त्यांचं शेत आमच्या खालच्या उऱ्याजवळच होतं. ते शेतातच राहात. दोघांच्या शेतांच्या मधून फक्त एक ओढा वाहत होता, त्याला सगळे 'नाहोलीचा ओढा' म्हणत. *जवळ असल्यानं आमच्या सुखदुःखाच्या प्रसंगी मोहनमामा आणि भामाआत्या सगळ्यांच्या आधी हजर असत.*
त्याकाळी आमच्यात कमीत कमी दोन बैलं आणि दोन म्हशी हमखास असत, त्या म्हशींची रेडकं वेगळी. नडीच्या प्रसंगी किंवा सुट्टी असेल तेव्हा मला म्हशी राखायला जावं लागायचं. निघायच्या आधी मला मोठी तयारी करावी लागायची. *पहिल्यांदा रेडिओवर ताबा मिळवावा लागे. त्याला चामड्याचं कव्हर असायचं, आणि चामड्याचाच पट्टा ! रेडिओचा पट्टा एकदा गळ्यात अडकवला की अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटे !!*
एका हातात साधारण माझ्याच उंचीइतकी काठी आणि दुसऱ्या हातात चिरगुटात बांधलेली चटणी भाकरी घेऊन चप्पल घालायला लागलं की, *म्हातारी बाई आठवण करुन द्यायची, "दुपारचं लई ऊन लागतंय, डोक्याला बांधाय काहीतरी घी ग माय."*
*"गमजा घेतलाय बाई", असं म्हणून मी डोक्याला पांढरा गमजा गुंडाळायचो.*
*'उन्हानं माणूस काळा पडतो', असा माझाही ठाम विश्वास होताच !*
खरं तर, *उन्हाळ्यात मराठवाडा खूप तापतो, म्हणून प्रत्येकाकडं पांढरा गमजा असतोच असतो. त्याला कुणी उपरणं म्हणतं तर कुणी बागायतदार !*
मला चांगलं आठवतं, त्यावेळी आमच्याकडं दोन म्हशी होत्या. एक लाडकी, दुसरी मंगळी. *गावाच्या बाहेर निघेपर्यंत मी म्हशींच्या मागं मागं चालत जायचो. मग मंगळीच्या पाठीवर बसायचो. मंगळी हत्तीसारखी धाडधिप्पाड होती, तिची पाठही तशीच लांबरुंद ! सावकाश पावलं टाकत मंगळी डुलत डुलत चालायची, तेव्हा शरीराला आणि मनालाही हेलकावे बसायचे. समोरुन येणारी लोकं कौतुकानं पुन्हा पुन्हा वळून बघत, तेव्हा अंबारीत बसलेल्या 'राजा'सारखं वाटायचं. अशी म्हशींवर बसून ऐटीत आमची स्वारी नह्यराकडं निघायची...*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*