दादा..! भाग - ४६
*दादा..!*
*भाग - ४६*
बीडमध्ये गाडी पोचायला दिवेलागण झाली...
रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे दिवे लागले होते.. शहरात, इमारतींवर, दिसेल तिथपर्यंत दिवेच दिवे दिसत होते.. *त्या दिव्यांच्या उजेडात न्हाऊन निघालेलं बीडचं रुप डोळ्यांत मावत नव्हतं !*
समोरच शिवरायांचा रुबाबदार, अश्वारूढ पुतळा दिसला...
*डाव्या हातात लगाम.. उजव्या हातात तळपती तलवार असलेले शिवराय !*
*भावनांचा लगाम खेचत कठोरपणे जबाबदारी पार पाडणारे राजे !!*
*संयम आणि कर्तृत्वाचं अनोखं उदाहरण जगाला दाखवून देणारे छत्रपती !!!*
भव्य, दिव्य पुतळ्याभोवती असलेली पाण्याची कारंजी राजेंना जलाभिषेक घालत होती !
विजेच्या रोषणाईत पाण्याचे ते थेंब सप्तरंगी भासत होते !!
*लख्ख प्रकाशात छत्रपती तेज:पुंज दिसत होते !!!*
'शिवछत्रपती' या चौथीच्या पुस्तकात वाचलेल्या कितीतरी घटना क्षणात माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. उर अभिमानानं भरून आला.. राजेंच्या चरणावर मनोमन नतमस्तक होत, आमचे हात आपोआप जोडले गेले !
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालून बस स्टँडवर पोहोचली. दादानं हातानं खुणावलं तसा एक रिक्षावाला 'सायकल रिक्षा' घेऊन आला. त्यावेळी शहरात बहुधा सायकल रिक्षाच जास्त असाव्यात..
"किधर जानेकाय?"
कासराभर अंतरावरुनच रिक्षावाल्यानं विचारलं.
"गिराम गल्ली.. कितने होतेय", दादा.
"गिराम गल्ली.. गिराम गल्ली"
असं पुटपुटत तो म्हणाला, "उधर.. किधर?"
"बोरा का वाडा.. मालूमै क्या..?"
*अशी मराठी आणि हिंदी एकमेकींच्या हातात हात घालून चालताना अनेकदा दिसायची !*
खव्याच्या निमित्तानं दादांना अनेकदा सोलापूर, पुण्याला जावं लागलं होतं. शेतातला माल विकायला त्यांना नेहमीच कळंब, बार्शीला जावं लागायचं.. त्यामुळं तेही मोडक्या तोडक्या हिंदीत दणकून बोलत.
गावातल्या मुसलमान आळीत गेलं की तिथंही असाच अनुभव यायचा. 'त्यांच्यातल्या त्यांच्यात' ते अशाच गुलाबी हिंदीत बोलत.
सदरुद्दीन, इन्नूस, सलीम या आमच्यासोबत शाळेत असलेल्या पोरांचं बोलणंही असंच होतं.. "भागते भागते धपकन पड्या.. पायजमा फट्या.. लोटा सट्या.. और कालवण सांड्या !"
*हिंदी चांगलं कळायला लागल्यावर आम्हाला त्यांच्या असल्या बोलण्याचं हसू यायचं...*
असं असलं तरी, रमजान ईदला भजे, गुलगुलं खायला, शिरखुर्मा प्यायला आम्हाला घरोघरचं आमंत्रण असायचं. थोड्या थोड्या वेळानं आम्ही दिवसभरात चार- पाच घरी तरी जायचो...
सत्तारभई, मुसा साहेब, हमीदभई, शरीफभई ही दादाच्या लोभातली माणसं. दिवाळीच्या पाडव्याला दादा त्यांना आवर्जून फरळाचं आमंत्रण देत. त्यातलेच एक उस्मानभई. तिकडं समाजाची स्वतंत्र गल्ली असताना, एकट्या उस्मानभईचं घर आमच्या गल्लीत होतं.. अगदी आमच्या घरासमोरच ! *त्यांचा आणि आमचा शेजारधर्म तर शेवटपर्यंत टिकला, रोजची वाटीभर भाजी एकमेकांच्या घरी जायची.. न चुकता !*
भाडं ठरलं, आम्ही सगळं चंबूगबाळ रिक्षात भरलं. तिघंही बसलो, तसं रिक्षावाल्यानं पायंडल मारायला सुरुवात केली.
क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*