दादा..! भाग - ४८
*दादा..!*
*भाग - ४८*
*'बिंदुसरा' ही गोदावरीची एक उपनदी ! याच नदीवर पाली गावाजवळ मोठं धरण बांधलं आहे.. बिंदुसरा धरण ! बीड शहराला पाणीपुरवठा करणारं हे मुख्य धरण ! बिंदुसरा नदी पुढं बीड शहरातून वाहते, आणि सिंदफणा नदीला मिळते. या नदीमुळं शहर दोन भागांत विभागलं आहे.*
बीडमध्ये त्यावेळी शिवाजी विद्यालय, चंपावती विद्यालय, भगवान विद्यालय आणि राजस्थानी विद्यालय या नावाजलेल्या शाळा होत्या. राजस्थानी विद्यालय थोडंसं लांब, जुन्या बीडमध्ये होतं. दादांनी आमची नावं भगवान विद्यालयात घातली होती, तिथले तिडके सर आणि मिसाळ सर त्यांच्या ओळखीचे होते.
सोमवार उजाडला.. शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस झाले होते, पण आमचा शाळेचा पहिला दिवस होता. आम्हाला शाळा माहीत नव्हती. दादा शाळेत सोडवायला येणार होते, त्यांना सरांचीही गाठ घ्यायची होती.
शाळेची वेळ साडेसात ते साडेबारा होती...
सकाळी लवकर उठून सगळं आवरलं. तिथंही तोच गणवेश होता.. पांढरा शर्ट.. खाकी पॅन्ट !
*आम्ही पेटीत घडी घालून ठेवलेले गणवेश काढले. शर्टावर घुड्या पडल्या होत्या, त्या हातानं साफ केल्या. चपचपीत तेल लावून भांग पाडला, गंध लावला. पावडर नव्हती.. पावडर मुलींनी लावायची असते, असा आमचा समज होता !* दप्तरासाठी आम्हाला आता नव्या वायरच्या पिशव्या घेतल्या होत्या.
आमच्या खोलीपासून चालत दहा मिनिटांच्या अंतरावर भगवान विद्यालय होतं. आम्ही थोडं लवकर जावून शाळेपुढं थांबलो. शाळेकडं येणारे सगळे रस्ते मुलांनी फुलून गेले होते. इन केलेली, पायांत सॉक्स, बूट घातलेली आणि छान छान दप्तरं असलेल्या मुलामुलींची संख्या जास्त होती. तुरळक आमच्यासारखीही होती. *मी त्यांच्याकडं पाहायचो.. पुन्हा आमच्याकडं पाहायचो.. आम्ही सगळ्यांत 'उठून' दिसत असल्यासारखं वाटायचं.. निदान मी तरी !*
दादा तिडके सरांना भेटले. आमची ओळख करून दिली, "पोरांकडं लक्ष ठिवा.." म्हणून सांगितलं.
सर म्हणाले, "काही काळजी करू नका, आम्ही आहोत.. तुम्ही जावा."
*आम्ही वर्गात जाईपर्यंत दादा तिथंच उभा होते.. आमच्याकडं बघत !*
भगवान विद्यालय दुमजली होतं. प्रत्येक इयत्तेच्या कमीत कमी ५-५ तुकड्या होत्या. माझं नाव ९ वी 'क' मध्ये होतं, तो वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता. *आतापर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेतल्या गुरुजींच्या हाताखाली झालं होतं. आता पहिल्यांदाच 'सर' शिकविणार होते. प्रत्येक विषयाला वेगळे सर !*
*काकडे सर आमचे वर्गशिक्षक होते, ते इतिहास शिकवत. त्यांचा सगळा इतिहास तोंडपाठ होता. हातात पुस्तक न घेता, गोष्टीच्या रुपात, आवेशपूर्ण, ओघवत्या भाषेत ते आशय समजावून देत. प्रश्नांची उत्तरं 'पॉईंट टू पॉईंट' लिहून देत. ते सांगत.. "जितक्या गुणांचा प्रश्न आहे, तितके पॉईंट उत्तरात लिहा, तुम्हाला माझ्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळतील !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*