दादा..! भाग - ५८
*दादा..!*
*भाग -५८*
*बीड म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा !*
*बीड म्हणजे कलाकारांचा बालेकिल्ला !!*
*बीड म्हणजे बालाघाटची डोंगररांग !*
*बीड म्हणजे माणुसकीची खाण !!*
*बीड म्हणजे साधू, संतांची भूमी !*
*बीड म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची कर्मभूमी !!*
*बीड म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी !*
*बीड म्हणजे जटायूची रणभूमी !!*
हो, हे खरं आहे...
*सीतेस पळवून नेणाऱ्या लंकाधीश रावणाशी जटायू याच भूमीत लढला !*
*द्वंद्वात घायाळ होऊन, मरणासन्न अवस्थेत तो याच ठिकाणी पडला !!*
*रावणाने छाटलेले त्याचे पंख याच मातीत मळले !*
*सीताहरणाची हकीगत प्रभुरामास सांगून, त्याने इथेच मृत्यूला कवटाळले !!*
याला आधार आहे...
*बीड शहराच्या 'पेठबीड' भागात यादव काळात बांधलेलं जटायूचं मंदिर आजही अस्तित्वात आहे !*
बीडमध्ये आम्ही आता चांगलंच रमलो होतो, बऱ्यापैकी रुळलो होतो. शाळा दिवशी शाळा करायची. सुट्टी असली की एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची, तिथली माहिती जाणून घ्यायची...
हे नित्याचंच झालं होतं !
*तीन चार महिन्यांत आम्ही अख्खं बीड पालथं घातलं !*
दसरा जवळ आला होता, बीडकरांना शहरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या खंडेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवाचे वेध लागले होते...
*खंडेश्वरी म्हणजे बीडचं ग्रामदैवत ! माहुर निवासिनी रेणुकामाता ही काळोबा वीर या भक्ताच्या विनंतीवरुन बीड शहरात आली. शहरातल्या एका टेकडीवर विसावली, त्यानं तिथंच तिचं मंदिर बांधलं, अशी आख्यायिका सांगितली जाते !*
*सुमारे पाचशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला !*
नवरात्रात नऊ दिवस तिथं वेगवेगळे कार्यक्रम होतात...
दसऱ्याच्या दिवशी आम्ही खंडेश्वरीच्या दर्शनाला गेलो. सुवर्णालंकारांनी सजलेलं खंडेश्वरी मातेचं रूप अतिशय विलोभनीय दिसत होतं. मंदिराच्या दहा एकर परिसरात अवघं बीड शहर लोटलं होतं. लोकं एक दुसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं देत होती.. आनंदानं गळाभेट घेत होती !
तिथून जवळच गर्द वनराईत, छोट्याशा टेकडीवर खंडोबाचं अतिशय पुरातन मंदिर वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी सजवलं होतं. मंदिरातील गर्भगृहात हातात तलवार घेतलेली, घोड्यावर आरूढ असलेली खंडोबाची दगडी मूर्ती भक्तांना आकर्षून घेत होती. मंदिराच्या समोर असलेल्या ७० फूट उंचीच्या दीपमाळा विद्युत रोषणाईनं उजळून निघाल्या होत्या. त्यावर कोरलेली सुंदर, सुंदर शिल्पे भाविकांचे लक्ष वेधून घेत होती...
*दोन देह मात्र एकच तोंड असणाऱ्या बैलाचं शिल्प आम्हाला खूप आवडलं !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*