दादा..! भाग - ५६
*दादा..!*
*भाग - ५६*
*१९८५ -१९८६ साली.. नववीला असताना जेवढे चित्रपट पाहिले, तेवढे पुढच्या ३५ वर्षांतही पाहायला जमलं नाही. याचं कारणही तसंच होतं..*
एकनाथ भाऊंना दोन मुलं.. देविदास अण्णा आणि शंकर बापू. देविदास अण्णांचा महादू आणि शंकर बापूंचा राजकुमार हे दोघंही बीडला शिवाजी विद्यालयात शिकायला होते.
*राजकुमार म्हणजे.. राजकुमारच ! गोरापान, गुटगुटीत, स्वच्छंदी आणि नावासारखाच मनानंही राजा !* त्याला सगळे बप्पा म्हणत. त्यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती, त्यामुळं त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. ते आमच्या आधीपासूनच बीडला शिकायला होते. मुलांचा अभ्यासाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून, भाऊंनी स्वयंपाक करायला, भांडी घासायला आणि कपडे धुवायला मोलकरीण ठेवली होती ! त्यांचे खाण्यापिण्याचे, कपड्यांचे लाडही कमी नव्हते. घरी पाळलेल्या म्हशींपासून निघणारं सगळं दूध ते घरीच ठेवत. त्याचं दही, तूप तयार करून आठवड्याला बीडला पाठवत...
*भाऊ म्हणत, "तूप खाल्ल्यानं बुद्धी जास्त चालते !"*
महादू आणि बप्पाकडं पैशांचीही काही कमी नव्हती. आम्ही ३० -३० पैसे वाचविण्यासाठी कट बुकींग करायचो, त्याच काळात बप्पाच्या शर्टच्या बाहीत १०० रुपयांची नोट ठेवलेली असायची !
नवीन असल्यानं आम्हाला बीडमधलं जास्त माहीत नव्हतं. *शाळा.. खोली आणि बस स्टँड.. एवढंच आमचं विश्व होतं !* आम्ही बीडला शिकायला आल्याचं बप्पाला माहीत झालं. एके दिवशी तो आमच्या खोलीवर आला. जवळच असलेल्या धांडे गल्ली आणि कबाड गल्लीतल्या गणपतीची आरास बघायला नेलं. त्यानंतर गणपती विसर्जन होईपर्यंत बप्पा रोज यायचा आणि आम्हाला गणपती बघायला घेवून जायचा.
*बप्पानं माळीवेस, धोंडीपुरा, सुभाष रोड तसेच जुन्या बीड मधले सगळे गणपतीबाप्पा आम्हाला दाखवले !*
बप्पाला चित्रपट बघायची खूप आवड होती. झुंजार नेता, चंपावती पत्र आणि पार्श्वभूमी ही बीडमधली त्यावेळची स्थानिक वर्तमानपत्र ! सगळ्या पेपरच्या शेवटच्या पानावर चित्रपटाच्या जाहिराती यायच्या. आमच्या खोली मालकाकडं झुंजार नेता यायचा. दुपारी जेवणं झाली की, आम्ही पेपर वाचत बसायचो. कोणत्या टॉकीजला कोणता चित्रपट लागलाय, ते आवर्जून बघायचो.. आणि गप्प बसायचो !
*शनिवारी संध्याकाळी आठच्या सुमारास बप्पा यायचा. आमची जेवणं चाललेली असायची. बप्पा म्हणायचा, " उरका, उरका लवकर.. आपल्याला पिच्चर बघायला जायचंय !" नाही म्हणायची सोय नव्हती, म्हणलं तरी बप्पा ऐकत नसायचा !*
सुट्टी असली, चांगले पिच्चर लागलेले असले की आठवड्यात दोन तरी व्हायचे, अर्थात सगळा खर्च बप्पाचा असायचा ! त्या वर्षभरात अमिताभचा तर एकही चित्रपट आम्ही सोडला नाही !
अशोक आणि विजय या टॉकीज जवळ होत्या, पण जालना रोडच्या हिना आणि लक्ष्मी, पांगरी रोडची संतोषीमाता आणि नगर रोडची आशा या टॉकीज लांब होत्या. आम्ही चालत जायचो, बारा-साडेबाराला पिच्चर सुटायचा.. परत रूमवर यायला एक वाजून जात !
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी*