दादा..! भाग - ६०
*दादा..!*
*भाग -६०*
*नववीला मला ७२% मार्क्स मिळाले.* सुरुवातीला काही महिने कृष्णाचं बीडमध्ये मन रमलं नाही, सारखं गावाकडं पळायचा. त्याचा त्याला फटका बसला. त्याला कमी मार्क्स पडले...
*आता १० वी.. म्हणजे मॅट्रिक.. बोर्ड !*
*१० वी बोर्डाची परीक्षा म्हणजे आयुष्यातली पहिली मोठी कसोटी, असं मानलं जायचं !*
खरं तर, विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच मॅट्रिकचं जास्त टेन्शन असायचं.
आमचे १० वीचे तास उन्हाळ्याच्या सुट्टीतच सुरू झाले, दीड महिन्यात गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांची चांगली तोंडओळख झाली, पण *उन्हाळ्याचे दिवस.. दिवसभर तास.. आणि हातानं तेच तेच करून खायचा त्रास.. नको नको वाटायचं !*
पाटोदा तालुक्यात भायाळा (वाघिरा भायाळा.. क्रिकेटपटू संजय बांगरचं गाव) नावाचं गाव आहे, तिथला सुभाष बांगर माझा चांगला वर्गमित्र झाला होता. तोही हातानं करून खायला वैतागला होता, म्हणून
आम्ही दोघांनी वसतिगृहाचा शोध सुरु केला...
बलभीम चौकात समाजकल्याणचं एक वसतिगृह होतं. तिथं खूप चांगल्या सोई, सुविधा होत्या. सकाळी प्यायला ग्लासभर दूध, रोज वेगळा नाष्टा, दोन वेळचं जेवण आणि तेल, साबण अशा किरकोळ खर्चासाठी महिन्याला ५० रुपये भत्ता ! एका खोलीत जास्तीत जास्त चार मुलं.. प्रत्येक मुलाला स्वतंत्र कॉट.. गादी..
परंतु ७२ टक्के मार्क्सवर माझा तिथं नंबर लागेल, असं वाटत नव्हतं !
बार्शी नाक्यावर, अशोकनगर भागात आणखी एक मुलांचे 'शासकीय वसतिगृह' होतं. तिथंही सगळं चांगलं होतं, पैसे मात्र मिळत नव्हते.
आम्ही दोन्हीकडं फॉर्म भरले...
*अशोकनगरच्या शासकीय वसतिगृहात आमच्या दोघांचेही नंबर लागले.* तिथून शाळा थोडी लांब होती. चालत जाणं, येणं करावं लागणार होतं, पण राहण्याचं, स्वयंपाकाचं टेन्शन मिटलं होतं.
शाळा सुरू झाल्या होत्या. माझ्या लहान भावाची.. बालूची सातवी झाल्यानं तोही आठवीला बीडला आला होता. कृष्णा, बालू रूमवर हातानं स्वयंपाक करून खात होती, मला वसतिगृहात आयतं मिळत होतं. सगळं चांगलं चाललं होतं !
एका रविवारी वेगळीच घटना घडली, मी रूमवर आलो होतो. कचरुलाल बोराच्या वाड्यात मांसाहार चालत नव्हता, हे बप्पालाही माहित होतं. तरी तो मासं घेऊन आला. आम्ही नको, नको म्हणत होतो...
तो म्हणाला, "कुणाला, काय कळतंय.. मुकाट्या करू."
त्यानं भाजी केली, आणि व्हायचं तेच झालं..
*सगळ्या वाड्यात माशाचा वास सुटला !*
जिजीनं विचारलं, "भाजी काय केलीय?"
बप्पा, "...."
जिजीनं रूममध्ये येऊन बघितलं..
*तिनं मासं तर खाऊ दिलं नाहीतच, पण आम्हाला तात्काळ रूम खाली करण्याचे आदेश दिले...*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*