दादा..! भाग - ६६
*दादा..!*
*भाग - ६६*
बीडच्या बलभीम चौकात समाज कल्याण विभागाचं वसतिगृह होतं. तिथं सकाळी दूध, नाष्टा, दोन वेळचं जेवण, ५० रुपये मासिक भत्ता आणि राहण्याची चांगली सोय होती. *दहावीला चांगले मार्क्स असूनही पहिल्या यादीत माझा नंबर लागला नाही, वेटींग लिस्ट मध्ये होतो.*
पाटोदा तालुक्यातील जवळाला गावचा बळीराम बन, दासखेडचा कृष्णा जाधव, शेवगाव तालुक्यातील सुनील बळवंते आणि मी असे चौघेजण एका रूममध्ये राहात होतो. कृष्णा आणि सुनील डी. एड. च्या दुसऱ्या वर्षाला होते...
दहावीला अभ्यासाचं टेन्शन होतं, त्यामुळं मित्रांसोबत बाहेर फिरणं, चहा, गप्पा यातलं काहीही करता आलं नाही. *डी.एड. ला प्रवेश घेतला सगळं कसं मोकळं मोकळं वाटायला लागलं !*
११ ते ४ कॉलेज असायचं. मी, बळीराम बन आणि शिवाजी मोहिते अशी तिघांची चांगली गट्टी जमली. आम्ही तिघं एकाच बेंचवर बसायचो. शिवाजी मोहिते माजलगाव तालुक्यातील देवडीचा, तो खोली करून राहायचा.
जेमतेम उंची आणि किडमिडीत शरीरयष्टी असलेले जगताप सर मानसशास्त्र शिकवत. *मानसशास्त्र म्हणजे कठीण विषय ! बालक.. ते भाषा कसं शिकतं? त्याचा शारीरिक विकास, मानसिक विकास, बुध्यांक.. अशा गहन मुद्यांवर जगताप सर दोन दोन तास.. एका सुरात लेक्चर देत...*
*काही समजत नव्हतं, सगळं डोक्यावरून जायचं !*
मूल्यमापनही तसा निरस आणि अवघड विषय, तो औटी मॅडमकडं होता. वर्षानुवर्षे त्या मूल्यमापन शिकवत, त्यामुळे त्यांचा सगळा अभ्यासक्रम तोंडपाठ होता. *मॅडमचा खडा आवाज, स्पष्ट उच्चार आणि मुद्देसूद मांडणी यामुळं मूल्यमापन सोपा वाटायचा.*
साठे सर अधून मधून कला, कार्यानुभव सारखे हलके फुलके विषय घेत.
बाकीचे सर आता आठवत नाहीत...
*डी. एड. कॉलेज म्हणजे, "कधीही जा.. मनाला वाटेल तेव्हा या" असा समज होता.*
पण, *"ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार" हे ब्रीद घेवून डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेली आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मानली गेलेली 'स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर' वेगळी होती. तिथं सगळे तास वेळापत्रकाप्रमाणे होत.*
*डॉ.बापूजी साळुंखे यांच्या संस्थेत डी. एड. करता आलं.. ज्ञान घेता आलं.. संस्कार झाले हे भाग्यच !*
*कधी कधी संस्कारावर संगत भारी पडते...*
रूममधील आम्ही चौघंही डी. एड. ला होतो. अभ्यासाचं टेन्शन नाही, खाण्यापिण्याचं टेन्शन नाही.
*सगळं मस्त चाललं होतं !*
आम्ही बुद्धिबळ खेळायला शिकलो. बघता बघता आम्हाला त्याची चांगलीच गोडी लागली, एकमेकांत चुरस निर्माण झाली..
*कधी कधी आम्ही पहाटपर्यंत खेळत बसायचो !*
आमच्या सगळ्यात बळीराम बन मोठा होता. तो दहावीनंतर १२ वी आणि B A फर्स्ट इयर करून डी. एड. ला आला होता. त्याला तंबाखूचं व्यसन होतं. *बुद्धिबळ खेळता खेळता तो म्हणायचा, "राजा, तंबाखू मळून दे की !"*
*मी म्हणायचो, "तुझं तू मळून खा."*
तो काही ऐकत नसे...
*म्हणायचा, "दुसऱ्यानं मळलेली जास्त चांगली लागते."*
*मलाही उत्सुकता लागली...*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*