दादा..! भाग -६२
*दादा..!*
*भाग - ६२*
दहावीचा निकाल लागला, तेव्हा मी गावाकडं होतो. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक त्यावेळी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येत. गावात तर कोणतंही वर्तमानपत्र येत नव्हतं, निकाल बघायला नांदूरला जावं लागणार होतं...
*मला पास होण्याची चिंता नव्हती, उत्सुकता होती ती फक्त टक्केवारीची !*
दिगंबर कदम खव्याचा व्यापार करत, आसपासच्या खेड्यातून खवा गोळा करण्यासाठी त्यांच्याकडं सायकली होत्या. त्यांचा युवराज आणि कुंभाराचा परभू हे दोघेही माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठे होते.. पण आमची मैत्री होती ! *वय, जात, परिस्थिती बघून थोडीच मैत्री होते?*
युवराज कडून सायकल घेतली, परभूला सोबत घेतलं आणि आम्ही नांदूरला निघालो.
दोघं बारीबारीनं सायकल चालवत होतो, नांदूर जवळ येत होतं. पेपर डोळ्यांपुढं दिसत होते, छातीत धडधड वाढत होती. मनात उगाच शंका येत होत्या..
पेपरमध्ये माझा नंबर असेल का?
छापता छापता चुकला तर नसेल ना?
*"मन चिंती ते वैरी न चिंती", म्हणतात ते काही खोटं नाही !*
*झुंजार नेता घेतला, माझा परीक्षा क्रमांक त्यात होता.. मी पास झालो होतो ! K025417 या परीक्षा क्रमांकातल्या एका एका अंकाची तीन तीन वेळा खात्री केली. खूप आनंद झाला !*
घरी आलो, सगळ्यांनाच उत्सुकता होती. मी पास झाल्याचं कळताच सगळ्यांना आनंद झाला. दहावी पास होणारा घरातला मी पहिलाच होतो. सगळेजण माझं तोंड भरून कौतुक करत होते.
*मला हिरो झाल्यासारखं वाटत होतं !*
आईला, बाईला चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता. काही न बोलताही त्यांचे चेहरे खूप काही सांगत होते. काकूनं तर माझी दृष्ट काढली. दादानं मारुतीला नारळ फोडायला लावलं, गल्लीत सगळ्यांना नारळ आणि साखर वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी आबानं भट्टीहून किलोभर खवा आणला. बायांनी त्याचे गुलाबजाम बनवले.
*प्लेटभर पोहे आणि वाटीभर गुलाबजाम.. आनंद साजरा करण्याची आमची ही जुनीच पद्धत होती !*
*मार्कशीट आणायला भगवान विद्यालयात गेलो. शाळेचे संस्थापक भा. वा. सानप सर ऑफिसमध्ये होते. मिसाळ सर, तिडके सर, सातपुते सर आणि काकडे सरही होते. तिडके सरांनी मला आत बोलावलं. सानप सरांकडं घेऊन गेले, आणि म्हणाले, "साहेब, हा राजेंद्र भिमराव गिते.. दहावीच्या परीक्षेत याला ७९.१४ टक्के गुण मिळाले आहेत, चार तुकड्यांतल्या एकूण १७५ मुलांत हा दुसरा आलाय !"*
*सानप सरांनी माझी पाठ थोपटली.. शाल, हार घालून सत्कार केला ! मी समोर पाहात होतो.. "गुणवंत विद्यार्थी १९८७" च्या बोर्डवर दुसऱ्या क्रमांकावर माझं नाव लिहिलेलं होतं.. मी भारावून गेलो.. माझे डोळे डबडबले.. आनंदाश्रू अनावर झाले !*
सगळ्या सरांचे आशीर्वाद घेतले..
*आयुष्यातला हा पहिला सन्मान खूप मोठं मानसिक बळ देणारा होता !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*