दादा..! भाग -६४
*दादा..!*
*भाग - ६४*
*रोज नवा गडी, रोज नवे राज्य !*
*नियतीच्या खेळासाठी, सारे जग सज्ज !!*
आजचा डाव जिंकला म्हणून,
खुश असतो गडी !
आता आपल्या आयुष्याची,
बसली म्हणतो घडी !!
*नियती मात्र रोज, नवीच खेळी खेळते !*
*जिंकलो जिंकलो म्हणणाऱ्याला, ती सपशेल हरवते !!*
*पुन्हा पुन्हा जिंकण्यासाठी,*
*जीव तोडून काम करतो !*
*नियतीच्या खेळातला प्यादा,*
*पुन्हा एक घर चालतो !!*
एके ठिकाणी वाचलेल्या या ओळी मला आठवल्या...
*खरंच, नियतीचा खेळच न्यारा आहे..*
*ती एका हातानं भरभरून देते.. दुसऱ्या हातानं ओरबाडून घेते !*
विहीर आणि घराच्या बांधकामाचं झालेलं थोडंसं कर्ज तीन चार वर्षांत डोईजड झालं होतं. त्यातून प्रत्येकाला आता सुटका हवी होती...
*आलेल्या संकटाला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं का एकेकानं सामोरं जायचं???*
आमचा सगळ्यात कठीण काळ चालू होता...
*चोरवाटेनं का होईना, कलीनं घरात प्रवेश केला होता !*
*दादा, आबांनं मनाच्या भक्कम तटबंदीच्या बळावर बांधलेल्या.. एकत्र कुटुंबाच्या अभेद्य बालेकिल्ल्याचा एक एक बुरुज ढासळू पाहात होता. बिघडलेल्या परिस्थितीचे लचके तोडायला टपलेली गिधाडं आमच्या घरावर रोज घिरट्या घालत होती !*
कधी कधी आबांचाही संयम सुटत होता..
पण,
*दादा 'दम'दारपणे लढत होते !*
*दादांनी सगळ्यांना बोलावलं, आणि म्हणाले, "दम काढा.. काही वेळा सगळ्यात चांगले दिवस बघण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं, हेही दिवस जातील !"*
दादा, आबांनी विचार केला, आणि निर्णय घेतला...
केज तालुक्यात सारणी नावाचं गाव आहे. तिथले दत्तू भांगे सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुकच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मुकादम होते. दादानं त्यांच्याकडून वीस हजार रुपये उचल घेतली, आणि बैलगाडीचा करार केला...
*मी इंजिनिअर होण्याची स्वप्नं बघत होतो, आणि घरी कारखान्याला जाण्याच्या हालचाली सुरू होत्या...* ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून राज्याला परिचित असलेल्या बीड जिल्ह्याच्या लौकिकात आमचंही कुटुंब आता एक वर्षाचं योगदान देणार होतं.
मला 'ते' दिवस आठवले..
*हेवा वाटावा असं जवळपास दोन डझन माणसांचं, गुण्यागोविंदानं नांदणारं, गावातलं एकमेव एकत्र कुटुंब.. घरात दुधदुभत्याची चंगळ.. पंचक्रोशीतल्या लोकांनी आवर्जून बघावी, अशी गर्द आमराई.. काळी कसदार पोटापुरती जमीन.. उन्हाळ्यात महिनाभर चालणारं खळं आणि बलुतेदारांना ओझं होईल, इतकं बलुतं वाढणारे दादा, आबांचे हात !*
कुटुंब अजूनही एकत्र होतं, पण..
*दुधाच्या धारा काढणारे आणि देताना न थांबणारे हात आता ऊस तोडणार होते...*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*