दादा..! भाग - ६३
*दादा..!*
*भाग - ६३*
*दहावीत ७९.१४ टक्के मार्क्स ! माझ्या आधी गावात इतके मार्क्स कुणालाही पडले नव्हते.* गावातल्या लोकांनी माझा सत्कार करायचं ठरवलं, त्यात आघाडीवर होते बब्रु डॉक्टर !
*खरं तर बब्रुवाहन जाधव 'कुष्ठरोग तंत्रज्ञ' म्हणून अंबेजोगाईला सरकारी नोकरी करत. गरीब रुग्णाला पदरमोड करून, त्याच्या घरी जाऊन सेवा देत. सगळे त्यांना 'बब्रु डॉक्टर' म्हणत !*
मुलामुलींची लग्न जमवणं, गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं अशा सामाजिक कार्याचीही त्यांना खूप आवड होती.
परीक्षा संपल्या की ते घरोघरी जात. मुलांनी अर्धवट लिहिलेल्या वह्या, पुस्तके, गाईड्स जमा करत. वह्यांची लिहिलेली पानं काढून टाकत...
*उरलेल्या कोऱ्या वह्या, पुस्तके गरजू मुलांना वाटत !*
माऊली महाराज आणि डॉक्टरांचा विशेष लोभ होता. दर एकादशीला दिवसभर ते चाकरवाडीत थांबत...
भक्तांना दर्शनासाठी, प्रसादासाठी मार्गदर्शन करणं, पंगतीत वाढणाऱ्या वाढप्यांना स्पीकरवरून सूचना देणं, पत्रावळ्या उचलणं, साफसफाई करणं अशी कामंही ते न थकता करत.
*लोक डॉक्टरांना वेड्यात काढायचे.. नावं ठेवायचे, पण त्यांना त्याची फिकीर नव्हती !*
*"चांगलं काम करणाऱ्या माणसाला लोक वेडंच ठरवितात !"*
गावातल्या मारुतीच्या मंदिरात डॉक्टरांनी माझा सत्कार केला. अर्धे गाव जमलं असेल. एकनाथभाऊ, तुकानाना, बलभीमबापू, बन्सी पाटील अशी जुनी जाणती माणसंही होती. *एकनाथ भाऊ म्हणाले, "गावातल्या गुणी मुलांचं दरवर्षी असं कौतुक झालं पाहिजे, दुसऱ्या मुलांनाही हुरुप येईल !"*
तिथून पुढं.. अनेक वर्षे बब्रु डॉक्टर गावात 'गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार' आयोजित करत होते.
*मुलांचं कौतुक आई बापांना नेहमीच सुखावणारं असतं ! माझ्या सत्काराला घरातले बहुतेक सगळेच हजर होते. गावानं केलेला हा सन्मान माझ्याही कायम स्मरणात राहिला !*
शाळा भरल्या होत्या..
प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती...
मी बलभीम कॉलेजमध्ये ११वी सायन्स साठी रजिस्ट्रेशन केलं. डी.एडला अर्ज भरला. बशीरगंज भागात पॉलिटेक्निक कॉलेज होतं, तिथं अर्ज केला.
*पण, प्रवेश कुठं घ्यायचा? ते निश्चित झालं नव्हतं !*
मी लोकांचे सल्ले ऐकत होतो...
*कुणी म्हणायचं, "सायन्स घेऊन ११ वी, १२ वी कर आणि मेडिकलला जा."*
*कुणी म्हणायचं, "पॉलिटेक्निक कर, इंजिनिअर होशील !"*
*ज्यांना घरची परिस्थिती माहित होती, ते म्हणत, "डी. एड. कर !*
*मी तर भांबावून गेलो होतो !*
डी.एड ची यादी अजून लागली नव्हती.
पद्माकर घुलेचं पक्कं ठरलं होतं, त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यानं अकरावीला ऍडमिशन घेतलं, त्याचं कॉलेजही सुरु झालं होतं...
सप्टेंबरच्या अखेरीस पॉलिटेक्निकची यादी लागली. सुभाष बांगर आणि अर्जुन घुमरेनं तिथं प्रवेश घेतले.
माझा जीव टांगणीला लागला..
*मलाही 'इंजिनिअर व्हावं' वाटायला लागलं !*
मग काय?
*घेतला पॉलिटेक्निकला प्रवेश !*
पंधरा दिवसांनी कॉलेज सुरु होणार होतं, म्हणून गावाकडं गेलो...
*घरी वेगळ्याच हालचाली सुरू होत्या...*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*