दादा..! भाग - ६८
*दादा..!*
*भाग -६८*
*प्रस्तावना, हेतुकथन, विषय विवेचन, संकलन आणि मूल्यमापन या हर्बार्टच्या पंचपदी नुसार टाचण काढणं, ते तपासून घेणं, शैक्षणिक साहित्य तयार करणं आणि वर्गावर प्रत्यक्ष पाठ घेणं हा डी. एड. प्रशिक्षणातला अविभाज्य भाग !*
पण शहरातल्या शाळेवर पाठ घेताना घाम फुटायचा. तिथली बनलेली पोरं.. त्यांच्या मागं पाठाचं निरीक्षण करण्यासाठी बसलेले सर.. आणि त्यात आमचा वर्गपाठ!
सुरुवातीला खूप घाबरगुंडी उडायची. तोंडपाठ केलेलं सगळं पाच सात मिनिटांत संपून जायचं. पुढचा वेळ कसा घालवायचा?
पण सरावानं हळूहळू जमायला लागलं !
डी एडच्या पहिल्या वर्षी.. दुसऱ्या सत्रात 'पाली' गावात आमचं 'श्रमदान शिबीर' आयोजित केलं होतं.
*बीड - मांजरसुंभा रस्त्यावर.. बीडच्या अगदी जवळ असलेलं आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं 'पाली' हे एक छोटंसं गाव ! उशाला असलेलं बिंदुसरा धरण म्हणजे पाली गावाला पहाटे पहाटे पडलेलं गोड स्वप्नच !*
*धरणाच्या बाजूला डोंगराच्या पोटावर सिमेंट काँक्रेटमध्ये कोरलेलं "BENDSURA PROJECT" हे ठळक अक्षरातलं नाव रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं सहज लक्ष वेधून घेतं...*
थंडीचे दिवस होते, आणि साठे सर मार्गदर्शक होते.
पहिल्या दिवशी गावात जायला आम्हाला थोडा उशीर झाला. सगळं गाव फिरून पाहिलं. सरांनी मुलींचा एक व मुलांचे दोन गट केले, गटप्रमुख नेमले. पुढील पाच दिवसांचं नियोजन सांगितलं आणि मग आम्हाला बिंदुसरा धरणावर नेलं...
*दूरपर्यंत पसरलेलं स्वच्छ, निळंशार पाणी.. वाऱ्याच्या झोतांबरोबर त्या पाण्यावर उठणारे लाटांचे तरंग आणि त्या लाटांवर स्वार होऊन मुक्तपणे जलविहार करणारे पांढरेशुभ्र बदक.. सायंकाळच्या वेळी बिंदुसरा धरणाचं हे रूप खूप विहंगम भासत होतं !*
दोन दिवस आम्ही गावातला मुख्य रस्ता, बस स्टँड, हनुमान मंदिर आणि शाळेचा परिसर स्वच्छ केला. सार्वजनिक पाणवठे स्वच्छ केले. केरकचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. नंतरच्या तीन दिवसांत घुमरे पाटलांच्या शेतात श्रमदान केलं.. त्यांच्याकडून शेतीच्या कामांची माहिती घेतली. डोंगर उतारावरील छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यात त्यांनी पेरलेलं बाजरीचं पीक जोमदार आलं होतं. त्यातलं उचलतण उपटणं, गवत खुरपून काढणं, कांदे, लसूण लावण्यासाठी वाफे तयार करणं, त्यातली माती खोऱ्यानं एकसारखी करणं, दारी धरणं.. उन्हात ही कामं करताना मुलं दमून जात होती, घामाघूम होत होती. पण, त्यातही सगळ्यांना आनंद वाटत होता...
*काम करून आलेल्या घामाचा सुगंध काही वेगळाच असतो !*
माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या मुलामुलींना ही सगळी कामं येत होती, पण शहरात वाढलेल्यांना हा अनुभव नवीन होता.
*शेवटच्या दिवशी घुमरे पाटलांनी सगळ्यांना बाजरीची भाकरी, कटाची आमटी, ठेचा आणि कांदा असा गावरान बेत केला !*
श्रमदान शिबिरातला एक आठवडा मजेत गेला...
खरंच, *सामुदायिक कामांतून मिळणारा आनंद कायम स्मरणात राहतो !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*