दादा..! भाग -७२
*दादा..!*
*भाग - ७२*
लग्न म्हणजे..
एके ठिकाणी खूप छान वाचनात आलं...
*लग्न म्हणजे.. एक रेशीमगाठ,*
*सहजीवनाचा सुंदर प्रवास !*
लग्न म्हणजे..
*आयुष्याच्या पुस्तकातलं एक सुंदर पान,*
*नात्यातल्या गोडवा बहरण्याचं सुंदर ठिकाण !*
लग्न म्हणजे..
*दोन जीवांना जोडणारा एक पूल,*
*आयुष्याच्या वेलीवरचं सुंदर फूल !*
लग्नाची थोडी घाईच झाली...
पण असो,
दादा, आबांना हवी 'तशी' सून घरात आली !
*त्या 'लगीनघाई'त सोन्यासारख्या संधीची मात्र माती झाली !*
त्याचं असं झालं...
११ जूनला लग्न होतं, सगळी तयारी झाली होती. आठवडाभर आधी लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी मी आणि कृष्णा बीडला गेलो. भगवान विद्यालयात शिक्षकांच्या जागा निघाल्याचं समजलं.
*१० जूनला मुलाखती होणार होत्या...*
आम्ही भगवान विद्यालयाचे संस्थापक श्री भा. वा. सानप सरांच्या घरी गेलो, सर घरासमोर आरामखुर्चीत बसलेले होते. अदबीनं त्यांच्यापुढं उभा राहिलो, ओळख करून दिली आणि भेटीचं कारण सांगितलं...
*सानप सर देवमाणूस होते !*
*त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं.. पाणी दिलं आणि म्हणाले, "तुला घेतो.. १० तारखेला मुलाखतीला ये."*
*ज्या शाळेत नववी, दहावी शिकलो, दहावीत १७५ मुलांत दुसरा आलो.. त्याच शाळेत मी शिक्षक होणार?*
कल्पना मनाला सुखावणारी होती !
खूप आनंद झाला...
पण *"दैव देते अन कर्म नेते" अशी माझी गत झाली !*
*हळदीच्या अंगानं शीव ओलांडू नये, असं तर्कट 'मोठ्या' माणसांनी मांडलं.*
... आणि मी मुलाखतीलच गेलो नाही !
दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक भरती व्हायची, पण नेमकी १९८९ आणि ९० साली झाली नाही. लोक म्हणत 'झिरो बजेट' लागू झालंय.
खरं होतं की खोटं? अजूनही माहीत नाही...
गरिबी वाईट असते !
बेकारी 'बेकार' असते !!
आणि गरीब सुशिक्षित.. बेकार राहिला तर?
तर तो विचारी होतो.. अकाली शहाणा होतो.. मनानं हळवा होतो आणि त्याला बरंच काही सुचायला लागतं !
*बेकारीच्या दोन वर्षांत गुरं राखत, शेतात काम करत.. मला अनेक कविता सुचल्या...*
झुंजार नेता, चंपावतीपत्रात "शिक्षक पाहिजेत" अशा जाहिराती यायच्या.. मी अर्ज करायचो. मुलाखतीला जायचो, पण कुठंही निवड झाली नाही...
*कशी होणार???*
*'जागा' आधीच 'फिक्स' असत. जाहिराती आणि मुलाखती निव्वळ फार्स असे.*
पण हे मला थोडं उशिरा कळलं !
१९९० साली अशीच एक घटना घडली. आमच्या गावापासून २० किलोमीटर अंतरावर सारणी नावाचं गाव आहे. तिथल्या संस्थेत शिक्षकांच्या जागा निघाल्याचं समजलं. तिथं मुलाखतीला गेलो, दादा सोबत होते.
*संस्थाचालक म्हणाले, "दुसऱ्याकडून पंचवीस हजार घेतो.. तुम्ही पाव्हणं.. पाच हजार कमी द्या.. दोन दिवसांत सांगा !"*
*आम्ही काहीच सांगितलं नाही...*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*