दादा..! भाग - ७१
*दादा..!*
*भाग - ७१*
*स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयात मला डी एड करता आलं, हे माझं भाग्यच !* आमच्या अध्यापक विद्यालयानं दोन्ही वर्षी सगळे शालेय, सहशालेय उपक्रम राबविले.
पहिल्या वर्षी सूक्ष्म पाठ, वर्गपाठ आणि श्रमदान शिबीर घेतलं तर दुसऱ्या वर्षीही वर्गपाठ, दुसऱ्या सत्रात सहल आणि 'अध्यापन सप्ताह' राबवला. जुन्या बीड मधल्या राजस्थानी विद्यालयाचं प्रशासन आणि अध्यापन कार्य आठवडाभर आम्ही सांभाळलं.
पहिली ते सातवीचे वर्ग.. प्रत्येक इयत्तेच्या किमान २ -२ तुकड्या.. ६०० च्या वर मुलं.. त्यात आम्ही सगळे शिकाऊ शिक्षक !
आमच्यातलाच चव्हाण मुख्याध्यापक झाला. त्यांनं वर्गशिक्षक नेमले आणि वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येकावर तास आणि विषयांची जबाबदारी सोपवली.
*मी चौथी 'अ' चा वर्गशिक्षक होतो !*
आठवडाभर अख्खी शाळा चालवणं सोपं नव्हतं. शिबीर काळात राजस्थानी विद्यालयातल्या शिक्षकांना दिवसभर शाळेत थांबण्याचं बंधन नव्हतं, तरीही मुख्याध्यापक श्री मुंदडा सर, शिक्षक श्री महाजन सर, सोहनी सर, केदार सर, वाघमारे सर.. असे अनेक शिक्षक दिवसभर थांबत, आम्हाला प्रेरणा देत, मार्गदर्शन करत. त्यांच्यामुळे आम्ही खूप काही शिकू शकलो.. शिकवू शकलो आणि ते शैक्षणिक शिबीर यशस्वीपणे पार पाडू शकलो ! आज या निमित्ताने राजस्थानी विद्यालयाचे मनापासून आभार !
माझी दुसऱ्या वर्षाची परीक्षा झाली. डी एड झालं की खात्रीनं नोकरी मिळायची. कृष्णानं दहावीची परीक्षा दिली होती. दहावीनंतर तोही डी एडच करायचं म्हणत होता.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आम्ही गावी आलो होतो. माझं डी एड झालं.. सरकारी नोकरी लागणार.. मी शिक्षक होणार.. याचं सगळ्यांना कौतुक होतं ! निकालाचा अजून पत्ता नव्हता, तरीही पाहुण्यांचं येणं जाणं चालू झालं होतं. घरात लग्नाच्या गप्पा रंगत होत्या. सगळं वातावरण कसं भारल्यासारखं झालं होतं !
*पाहुणे येत..*
*मुलगी बघायला बोलवत...*
*दादा, आबा लटकंच म्हणत, "बघू की.. पोराला अजून नोकरी नाही."*
पाहुण्यांचं उत्तर ठरलेलं असायचं, "मुलाचं डी एड तर झालंय.. नोकरीचं काय.. आज ना उद्या लागंल.. मुलगी बघून घ्या.. तोपर्यंत जमवून ठिवू !"
*लग्नाच्या गप्पा सगळ्यांनाच आवडतात !*
*डी एड झालेल्या मुलांना त्यावेळी खरंच खूप डिमांड होतं. मुलीचे वडील डोळं झाकून त्यांना मुली देत !*
*एकविसाव्या शतकातली मुलं खरंच हुशार आहेत, व्यवहारी आहेत ! नोकरी लागल्याशिवाय, स्वतः च्या पायांवर उभं राहिल्याशिवाय लग्नाचा विचार करत नाहीत. नव्वदच्या दशकात.. ग्रामीण भागात तरी असं नव्हतं. घरातल्या मोठया माणसांनी सांगायचं, निर्णय घ्यायचा आणि मुलांनी ऐकायचं.*
कमी अधिक प्रमाणात सगळीकडं अशीच परिस्थिती असेल !
*आमच्या दादा आबांचे विचार तर खूप वेगळे होते.* *त्यांना वाटायचं.. आपलं, आपल्या बायकांचं आयुष्य उन्हातान्हात राबण्यात गेलं, शेतात कष्ट करण्यात गेलं. पोरं शिकली.. नोकरीलाही लागतील.. त्यांच्या, त्यांच्या बायकांच्या वाट्याला तरी 'ऊन' येऊ नये !*
दादा म्हणत,"तुम्ही दिवसभर नोकरी करून दमून, भागून घरी आल्यावर तांब्याभर पाणी द्यायला.. चहा करून द्यायला बायको घरी असायला पाहिजे की नाही?"
*आम्ही होकारार्थी माना डोलवायचो...*
मग आबाही म्हणत, "पोटापाण्याची आबाळ व्हायला नको, दोघंबी कामाला गेल्यावर तुमची बडदास्त राहील का?"
*आम्ही नकारार्थी माना हालवायचो...*
*दादा, आबांनी ठरवून टाकलं.. नोकरी करणारी मुलगी सून करायची नाही. त्यामुळं तायडीचा विषयही आपोआप निकाली निघाला !*
*दादा, आबा थोडक्यात समाधान मानत !*
आणि,
*खरं सांगायचं तर, त्यावेळी मीही लग्नाबद्दल गंभीर नव्हतो !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*