दादा..! भाग - ७८
*दादा..!*
*भाग - ७८*
*वशिला लावला म्हणजे नोकरी पक्की झाली, असा ग्रामीण भागात त्यावेळी समज होता. खरं तर त्यात काही प्रमाणात तथ्यही होतं आणि आजही आहे. कारण...*
*नोकरी असो, बढती असो की बदली, वशिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही!*
*एवढंच काय वशिल्याशिवाय, देवळातला देवही 'लवकर' दिसत नाही !!*
वशिला कुठं नसतो?
सगळीकडं वशिला लावला जातो, आणि सगळीकडं वशिला चालतो. कोणतंही काम करताना 'शॉर्ट कट' वापरणं म्हणजे वशिलाच की ! *वशिला चालत नाही असं एकच क्षेत्र असेल ते म्हणजे नशीब !*
*सरस्वती विद्यालय बीड या खाजगी शाळेत माझं काम चालू होतं, पण मला सरकारी शाळेत काम मिळावं म्हणून दादांचं 'काम' चालू होतं !*
*प्रयत्न करून करून दादांनी जुगाड घातलंच !* जगन्नाथ कदम नावाचे केजला एक शिक्षक होते. ते आमच्या गावतलेच होते, पण ते केजला राहत. कदम गुरुजी म्हणजे अत्यंत सज्जन आणि सालस माणूस ! दुसऱ्याचं वाईट करणं तर सोडाच, गुरुजींनी कधी कुणाचं वाईट चिंतीलही नसेल ! ते जितके स्वच्छ, टापटीपमध्ये राहात, तितकेच त्यांचे विचारही निर्मळ होते. दादा आबांचे ते खास मित्र ! गावाकडं आलं की ते आवर्जून आमच्या घरांकडं येत. सर्वांची आपुलकीनं चौकशी करत..चौकशा नाही ! आबांची व त्यांची चेष्टा-मस्करी चाले. त्या चेष्टेत किंचितही कुठे द्वेष नसे. वैयक्तिक, कौटुंबिक अडीअडचणीवरही दादा, आबांची व गुरुजींची चर्चा व्हायची. गरज असेल तिथं ते एक दुसऱ्याला सल्ला देत, मार्गदर्शन करत आणि मदतही करत.
कदम गुरुजींच्या शाळेत हांडे नावाचे एक शिक्षक होते. त्यांचे मोठे भाऊ सोलापूर जिल्हा परिषदेतील एका विभागात अधिकारी होते. *दादांनी कदम गुरुजींमार्फत साहेबांकडे लिंक लावली. दोघांत बोलणं झालं आणि दादांनी १५ हजार रुपये व्याजाने काढून (दमदशे ५ रु) त्यांच्या हवाली केले. त्यावेळी १५ हजार रुपये ही फार मोठी रक्कम होती !*
निवड मंडळाची शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरू होती. परीक्षा चांगली गेली, मुलाखत चांगली झाली, म्हणून मला माझी निवड पक्की वाटत होती, तर वशिला लावल्यामुळं घरातील सर्वांनाच माझ्या नोकरीची खात्री वाटत होती.
ऑगस्ट महिना सुरू होता. मला अचानक थकवा जाणवू लागला, अंग मोडून आलं. दोन महिन्यांत खूप धावपळ, दगदग झाली होती, दर आठवड्याला गावी जाणं येणं व्हायचं. त्यामुळे 'असं' होत असेल असं वाटलं म्हणून मी दुखण्याकडं दुर्लक्ष केलं, अंगावर दुखणं रेटून न्यायचा प्रयत्न केला. त्यात दोन तीन दिवस गेले असतील.
शनिवारी गावाकडं आलो, जास्तच अस्वस्थ वाटायला लागलं. काही खाऊपिऊ वाटेना. पोटात वेदना व्हायला लागल्या, मळमळ उलट्या व्हायला लागल्या. गावात दवाखानाही नव्हता. तडफडत, रात्र काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी दादा मला शिरूरच्या पांडू डॉक्टरकडे घेऊन गेले. *पांडू डॉक्टरचा दवाखाना म्हणजे एक साधं घर होतं ! त्या घरात टेबल, खुर्ची मांडून डॉक्टर बसलेले असत. शेजारी पेशंटला तपासण्यासाठी एक कॉट होता. बाजूला एका ट्रे मध्ये गोळ्यांचे छोटे मोठे पॉकेट्स असत, दुसऱ्या ट्रे मध्ये औषधांच्या बाटल्या आणि एका कोपऱ्यात स्टोव्हवर इंजेक्शनच्या सुया सतत उकळत ठेवलेल्या असत.* काहीही दुखायला लागलं की आसपासच्या तीन-चार खेड्यातली लोकं त्यांच्याकडं येत. सर्व आजारांवर त्यांच्याकडे इलाज व्हायचा.
*"पांडू डॉक्टर आधी कंपौंडर होते, दुसऱ्या डॉक्टरांच्या हाताखाली शिकून ते डॉक्टर झाले आहेत," असं लोक म्हणत. काहीही असो पण पांडू डॉक्टरांचा गुण यायचा !*
डॉक्टरांनी काय होतंय ते मला विचारलं. *डोळे, नखे, बोटे तपासली. तात्पुरत्या औषधी, गोळ्या दिल्या आणि दादांना म्हणाले, "नांदूरला जावून रक्त, लघवी तपासून घ्या, ऊस खायला द्या. तेलकट, तिखट, आंबट खायला देऊ नका आणि आराम करायला सांगा !"*
*काविळीची लक्षणं दिसत आहेत !"*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*