अस्वस्थ शिक्षक अन हरवलेले शिक्षण !
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट) शाखा - पुणे आयोजित निबंध स्पर्धेसाठी...
*अस्वस्थ शिक्षक अन् हरवलेले शिक्षण !*
--------------------------------------------------
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, *"शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही !"*
खरं आहे,
*शिक्षण म्हणजे ज्ञान,*
*शिक्षण म्हणजे संस्कार !*
*शिक्षण म्हणजे माणसाच्या,*
*अंतर्मनाचा हुंकार !!*
*शिक्षणाने माणूस शहाणा होतो, शिक्षणाने माणूस जागा होतो ! शिक्षणानेच माणूस उसवलेल्या समाजाला सांधणारा धागा होतो !!*
शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातून वाहिली पाहिजे. वाडी, वस्तीपर्यंत ती पोहोचली पाहिजे, म्हणून सरकारनं गावागावात सरकारी शाळा काढल्या. *बहुजनांची मुलं शिकावीत, शिक्षण प्रवाहात ती टिकावीत म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला राजाश्रय दिला. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. महात्मा जोतीराव फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटवली. सामाजिक द्वेषाच्या वादळातही सावित्रीबाईंनी क्रांतीची ती ज्योत तेवत ठेवली. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर जगदाळे मामा यांनी शिक्षणसंस्था उभारल्या. शाळा, वसतिगृहे सुरू केली. त्यातून गोरगरिबांची मुलं शिकू लागली, मोठी होऊ लागली. परिणामी आर्थिक, सामाजिकदृष्टया मागास असलेला समाज झपाट्यानं प्रगती करताना दिसू लागला...*
पण,
*'काळ' पुढे सरकला...*
मागील वीस वर्षांत जशी सरकारं बदलली तशी सरकारी धोरणं बदलली. सरकारनं इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना मोठ्या प्रमाणात परवानग्या दिल्या. मुजोर संस्थाचालकांनी मुलांची पळवापळवी सुरू केली. खाजगी शाळांचं उदात्तीकरण आणि सरकारी शाळांची गळचेपी सुरू झाली. *इंग्रजी माध्यमाच्या 'खाजगी शाळा' आणि मराठी माध्यमाच्या 'सरकारी शाळा' यांच्यात झुंज लावून सरकार गंमत बघू लागलं !*
मराठी शाळेतले शिक्षक म्हणजे गुरुजी ! गुरुजी कशातही कमी नाहीत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर ते मराठी शाळेचा वेल गगनाला भिडवू शकतात ! *MPSC, UPSC ची टॉपर मुलं जेव्हा, "आम्ही जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकलो!" म्हणून सांगतात तेव्हा गुरुजींच्या अंगावर मूठभर मांस चढतं. खरंच, मराठी शाळांत फक्त शिक्षण नाही तर संस्कारही रुजवले जातात !*
शिक्षकांचं काम शिकविण्याचं, मुलांना घडविण्याचं ! पण अलीकडच्या काळात शिक्षकांना शिकवायला वेळच मिळू नये याचा सरकारनं पुरेपूर बंदोबस्त केला आहे, असं वाटतं. सार्वत्रिक निवडणूका, जनगणना अशा राष्ट्रीय कार्यात शिक्षक नेहमीच आघाडीवर असतात, तरीही *सरकारनं शिक्षकांना शैक्षणिक कामांपेक्षा अशैक्षणिक कामांना जुंपून "सांगकाम्या" बनवलं आहे, त्यामुळं "अस्वस्थ शिक्षक आणि हरवलेले शिक्षण" अशी एकंदर अवस्था झाली आहे...*
त्याचीच ही काही उदाहरणं...
सरकारनं शालेय पोषण आहाराचं लोढणं शिक्षकांच्या गळ्यात बांधलं. त्यामुळं इंधन, भाजीपाला आणि पूरक आहाराची व्यवस्था करताना आणि धान्यादी मालाची तोंडमिळवणी करताना शिक्षकांना "आचारी" व्हावं लागतं !
शाळाखोल्या, किचन शेड, कंपाऊंड वॉल आणि स्वच्छतागृहांचं बांधकाम करताना तसेच त्यांची दुरुस्ती करवून घेताना शिक्षकांना "गवंडी" बनावं लागतं !
'गणवेश शिवून घेणे' हाही असाच एक मजेशीर विषय ! निविदा प्रक्रिया, कापड खरेदी आणि प्रत्येक मुलाच्या मापाचा गणवेश शिवून घेताना शिक्षकांना "शिंपी" असल्याचीच प्रचिती येते !
अशा *असंख्य अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांनी मुलांना शिकवायचं कधी???*
हा खरा प्रश्न आहे...
*रोज नवी माहिती असते,*
*रोज नवा आदेश येतो !*
*कधी तोंडी, कधी लेखी,*
*रोज नवा संदेश येतो !!*
आजच माहिती द्या, आत्ताच द्या, ताबडतोब द्या.. असे फतवे तर व्हाट्स एपवर रोज कितीतरी येतात...
या वर्षीचंच उदाहरण बघू,
१५ जूनला शाळा भरल्यापासून प्रवेशोत्सव साजरा करा, प्रवेश दिंडी काढा आणि फोटोसह माहिती द्या. सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी घ्या, उत्तर चाचणी घ्या आणि दिलेल्या लिंकवर माहिती भरा. पायाभूत चाचणी घ्या.. ऑनलाइन माहिती भरा. निरक्षरांचे सर्वेक्षण करा, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा आणि नमुन्यात माहिती द्या. दरमहा शिक्षण परिषद घ्या, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घ्या आणि दिलेल्या लिंकवर ऑनलाइन माहिती भरा !
मागील काही दिवसांपासून तर धक्कादायक बातम्या ऐकायला येत आहेत...
*सरकार सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना "दत्तक" देणार !*
*कमी पटांच्या शाळा बंद करून "समूह शाळा" तयार करणार !*
*व्वा...!!!*
*"कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ !" म्हणतात, त्याप्रमाणे सरकारच सरकारी शाळांच्या मुळावर उठलं आहे की काय? अशी शंका येते !*
सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळेच शिक्षक अस्वस्थ आहेत आणि शिक्षण हरवत चाललं आहे !
म्हणून,
*"आम्हाला शिकवू द्या !" हा शिक्षकांचा आक्रोश आहे !*
*श्री राजेंद्र भिमराव गिते*
*उपशिक्षक*
*जि प प्राथ शाळा रस्तापूर*
*ता बार्शी जि सोलापूर*
*मो नं -9881131509*