१५९) ग्राम 'पंचायत'
*खडे.. ओरखडे !*
*१५९)ग्राम'पंचायत'*
*वॉर्डावॉर्डात चर्चा झाल्या,*
*गटा गटांत बैठका झाल्या !*
*बिनविरोध निवडणुकीसाठी,*
*पारावर 'जोर, बैठका' झाल्या !!*
*जुनी खुटे हटत नाहीत,*
*नव्यांना जुने पटत नाहीत !*
*ग्राम बिनविरोध होणार कसे?*
*"पंचायती" काही मिटत नाहीत !!*
◆◆◆◆◆
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*