*प्रज्ञा बरबडे*

*लेकीनं फेडले पांग !*


*जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात...*


*कुळी कन्या पुत्र,*

*होती जे सात्विक,*

*तयाचा हरिख वाटे देवा !*


  *आपलं शरीर आणि आपली मुलं ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती असते ! निरोगी, धडधाकट शरीर असलं आणि आपल्या डोळ्यादेखत आपली मुलं सन्मार्गाला लागली तर मिळणारं समाधान हे कशातही मोजता येत नाही !*

अशीच ही एक घटना...


  *आमच्या रस्तापूर गावचे सुपुत्र आणि आपल्या पानगाव केंद्रातील दडशिंगे शाळेचे मुख्याध्यापक, आमचे मार्गदर्शक आणि मित्र श्री प्रभाकर बरबडे सर (अण्णा) म्हणजे एक सालस व्यक्तिमत्त्व ! डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि कामावर निष्ठा ही अण्णांची खरी ओळख ! मूर्ती छोटी असली तरी रोज दोन तास हॉलीबॉलच्या मैदानावर घाम गाळणारे, शरीरानं काटक आणि सर्वांना आरोग्याचा मंत्र देणारे अण्णा शिक्षण सेवाही तितकीच तन, मन आणि धन लावून करतात. चांगल्या कर्माची फळंही नेहमी चांगलीच मिळतात. शिक्षण हे तर पवित्र कार्य आहे !*


*चांगल्या कर्माचं फळ अण्णांनाही चांगलं मिळालं. त्यांची लाडकी लेक कु प्रज्ञा हिचं नुकतंच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तिनं काल दि 7 ऑगस्ट 2023 रोजी बेंगलोर येथील नामांकित "PURE  STORAGE" ही कंपनी जॉईन केली आहे...*


*प्रज्ञा..*

*खूप खूप अभिनंदन !*


*PURE आनंदाचं STORAGE करून ठेवावं असाच हा दिवस ! कंपनीच्या जगभरात 34 शाखा आहेत. भारतात बेंगलोर येथील ही एकमेव शाखा !*


*संपूर्ण बरबडे परिवाराची 'पुणे ते बेंगलोर' मोफत हवाई प्रवासाची सोय.. तिथं पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था.. कंपनीचं भव्य, दिव्य आणि चकचकीत ऑफिस.. त्यात प्रज्ञासाठी स्वतंत्र केबिन आणि वार्षिक तब्बल 32 लाखांचं पॅकेज !*

*अजून काय पाहिजे !*

*सगळंच अदभूत आणि अविस्मरणीय !!*


*मनाच्या गाभाऱ्यात कायमस्वरूपी जतन करून ठेवावेत इतके सुंदर हे क्षण संपूर्ण बरबडे परिवाराला 'याची देही याची डोळा' पाहता आले. डोळे आनंदानं भरून आले.. कष्टाचे चीज झाले.. अंगावर मूठभर मास चढले आणि 'याचसाठी केला होता अट्टहास' याची प्रचिती आली !*


*प्रज्ञा..*

*अब कर लो दुनिया मुट्ठीमें !!*


*बरबडे परिवाराचं मनापासून अभिनंदन आणि प्रज्ञाला पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा !*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य