*मा. भास्कर ढाकणे साहेब*
*सन्मान नेतृत्वाचा !!!*
*आदरणीय,*
*श्री.भास्कर ढाकणे साहेब,*
*तमन्नाओं की महफिल तो,*
*हर कोई सजाता है !*
*लेकिन पूरी उसकी होती है,*
*जो तकदीर लेकर आता है !!*
*शिक्षण म्हणजे सेवा, सेवा म्हणजे व्रत, आणि व्रत म्हणजे समर्पण असं मानून आपण ३८ वर्षे 'शिक्षण सेवा' केली. ३१ मे २०२३ रोजी नियत वयोमानानुसार आपण सेवानिवृत्त होत आहात, त्यानिमित्त पानगाव नगरीत होत असलेल्या "सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास" मनःपूर्वक शुभेच्छा !*
साहेब,
सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या कर्तृवाने सुजलाम सुफलाम झालेल्या माळशिरस तालुक्यात १९८५ साली आपली प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. खुडूस केंद्रातील बोरकरवस्ती ही आपली पहिली शाळा ! तेथील आपल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचा आजही लोक आदराने उल्लेख करतात...
आपण तिथेच रमणार असे सर्वांनाच वाटत होते, परंतु मायभूमीच्या ओढीने आपल्याला भगवंत नगरीत खेचून आणले. लाडोळे, मानेगाव या शाळांच्या जडणघडणीत आपले मोलाचे योगदान राहिले आहेच पण आपल्या क्षमतेचा, आपल्या कौशल्याचा खरा कस लागला तो सर्व शिक्षा अभियान काळात ! अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्याचे गटसमन्वयक पद आपण तितक्याच ताकदीने सांभाळले. तालुक्यातील शाळा भौतिक सोयी सुविधांच्या बाबतीत परिपूर्ण व्हाव्यात यासाठी मनापासून प्रयत्न केले आणि त्यात यशस्वीही झालात...
*२०१९ ला केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून आपण पानगाव नं १ मध्ये हजर झालात. अलीकडच्या काळात पानगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणूनही आपण काम पाहिले. केंद्रातील शिक्षकांना प्रेरित करून त्यांच्या कार्यक्षमतेचा आपण कुशलतेने उपयोग करून घेतला. "भूमिका त्यांनाच दिली जाते, जे ती भूमिका नीटपणे वठवू शकतात !" केंद्रीय मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या दोन्ही भूमिका आपण नीटपणे वठवल्या !*
पानगाव जागरूक आहे, पानगाव संवेदनशील आहे, हे खरे आहेच पण..
*मा प्रकाश नलवडे साहेब माळशिरस तालुक्यात केंद्रप्रमुख होते, पानगाव केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले !*
*मा दत्तात्रय पवार साहेब माळशिरस तालुक्यात गटसमन्वयक होते, पानगाव केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले !!*
*मा भास्कर ढाकणे साहेब, तुम्ही माळशिरस तालुक्यात शिक्षक होतात, तुम्हीही पानगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणूनच सेवानिवृत्त होत आहात !!!*
खरंच, *पानगाव 'पावन भूमी' आहे...!*
*आपल्या सर्वांचे योगदान पानगाव केंद्राच्या कायम स्मरणात राहील !*
*साहेब, 'प्रामाणिक सेवेची फळे गोड आणि रसाळ मिळतात.' तुम्हालाही मिळाली आहेत !*
जितक्या नेटाने आपण शिक्षणसेवा केली, तितकाच नेटका प्रपंच केला...
आता *मुले स्वतःच्या पायावर उभी आहेत !*
*चांगले घर आहे, बँक बॅलन्स आहे !!*
*स्थावर आहे, सगळं 'स्थिरस्थावर' आहे !!!*
तरीही किती धावपळ करता???
*आता कुटुंबाला वेळ द्या,*
*नातवंडांचे खेळ घ्या !*
*बार्शी - कोरेगाव प्रवासाचा,*
*थोडा "ताण" कमी करा !*
*आता जीवाची थोडी,*
*"ओढाताण" कमी करा !*
बस एवढेच...
*आपल्या भावी सुखी, समाधानी, आरोग्यदायी व आनंददायी आयुष्यासाठी रस्तापूर शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा !*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*